ठाणे : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात अंधाधूंद गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी दोन राउंड फायर केल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. यानंतर आता विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत्यू व्यक्तीचे नाव हरीश गझवानी असं असल्याचे समोर आले आहे. पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेतील हल्लेखोर फरार झाला आहे. या घटनेमुळे स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे.