छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाचा जन्म होताच मृत्यू झाला. मात्र, या मृत बाळाला शेवटचा स्पर्श करण्यासही आई-वडिलांनी नकार दिला. धार्मिक कारण देत त्यांनी बाळाला हात लावण्यास नकार दिल्यानं अखेर स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच अंत्यविधीची जबाबदारी पार पाडली. देव-धर्माच्या श्रद्धेपुढे माणुसकी हरली का? एका निष्पाप जीवाच्या अखेरच्या प्रवासातही आई-वडिलांची माया मिळू शकली नाही. या घटनेनं अनेकांचे डोळे पाणावले आहेत. नवरात्रीचा उत्साह. देवीच्या आराधनेत रमलेलं शहर. एकीकडे जन्मदात्रीची पूजा, तर दुसरीकडे जन्म दिलेल्या बाळाच्या मृत्युनंतर नवरात्रीचे कारण देत त्याच्या मृत शरीराला शेवटचा स्पर्शही न करणारे उलट्या काळजाचे जन्मदाते! छत्रपती संभाजीनगरात घडलेल्या या घटनेने हृदय पिळवटून गेले आहे. नऊ महिन्यांनंतर बाळ जन्माला आलं. मात्र जन्म होताच त्यानं जीव सोडला.
नवरात्री सुरु असल्याने आमच्याकडे बाळाला स्पर्श करत नाहीत, असं कारण देत मृत बाळाला शेवटचा स्पर्श करण्यासही आई-वडिलांनी नकार दिला. त्यामुळे या चिमुकल्या बाळाच्या अंत्यविधीची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला. शेवटी स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बाळाचा अंत्यविधीची पार पाडला. मनाला चटका लावणाऱ्या या घटनेने सगळेच हादरले आहेत. ज्या निष्पाप जीवाने जग पाहण्याआधीच जीव सोडला, त्याला शेवटचा स्पर्शही त्याच्या आईवडिलांचा मिळू नये, दोन तळहातात मावणाऱ्या स्वतःच्याच बाळाचा मृतदेह शिवण्यास धार्मिक कारणामुळे नकार देण्याचा प्रकार समोर आल्याने देव धर्म श्रद्धेपुढे माणुसकी हरली का? हा प्रश्न अस्वस्थ करणारा ठरतोय. या घटनेने संभाजीनगर हळहळले आहे. शासकीय नोकरीला असल्याची थाप मारून लग्न केले, मात्र लग्नानंतर काही दिवसांतच पतीचा बनाव उघड झाला. त्यातच स्वयंपाक आणि कपड्यांवरून सासरच्या मंडळींकडून सतत हिणवले जात असल्याचा आरोप आहे. या सगळ्या मानसिक त्रासातून छत्रपती संभाजीनगरच्या हडको परिसरात एका 23 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.