महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली! जयंत पाटील–फडणवीसांची चर्चा सुरु असताना पवारांनी जे केलं त्याने वेधलं सर्वांच लक्ष

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील तळेगावात आयोजित एका खासगी कार्यक्रमामध्ये एकाच व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि जयंत पाटील एकत्र दिसले.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली! जयंत पाटील–फडणवीसांची चर्चा सुरु असताना पवारांनी जे केलं त्याने वेधलं सर्वांच लक्ष
Maharashtra Politics

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील तळेगावात आयोजित एका खासगी कार्यक्रमामध्ये एकाच व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि जयंत पाटील एकत्र दिसले. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी स्वतःहून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधला. त्यानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात देखील संवाद होताना दिसला.

हेही वाचा- ‘मतमोजणीचे मूळ व्हिडीओ रेकॉर्डिंग गहाळ कसे होऊ शकते?’; निवडणूक आयोगावर सर्वोच्च न्यायालय संतापले, दिला थेट अल्टिमेटम!

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे शरद पवार आणि जयंत पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा संवाद पाहून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट सत्तेत सहभागी होणार असं म्हटलं जात होत. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ही चर्चा फेटाळून लावण्यात आली होती.

तसेच जयंत पाटील यांनी काही कामानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जावून भेट घेतली होती. त्यामुळे जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान या चर्चांचं खंडन स्वत: जयंत पाटील यांनी केलं होतं. या सगळ्या चर्चा एकीकडे होत असताना आता चार दिग्गज नेते एकाच मंचावर आल्याने पुन्हा राजकीय चर्चांना फोडणी मिळाली आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर, पाहा जय महाराष्ट्र न्यूज

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number