निर्भया प्रकरण : सर्व दोषींना एकत्रच फाशी – दिल्ली उच्च न्यायालय

निर्भया प्रकरणातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी ही याचिका न्यायालयात सादर केली होती. निर्भया प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर फाशी व्हावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. निर्भया प्रकरणातील सर्व ४ दोषींना एकत्रच फाशी दिली जाणार असल्याचं उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं आहे. बुधवारी (आज) या याचिकेवर सुनावणी […]

निर्भया प्रकरण : सर्व दोषींना एकत्रच फाशी – दिल्ली उच्च न्यायालय

निर्भया प्रकरणातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी ही याचिका न्यायालयात सादर केली होती.

निर्भया प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर फाशी व्हावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती.

निर्भया प्रकरणातील सर्व ४ दोषींना एकत्रच फाशी दिली जाणार असल्याचं उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं आहे.

बुधवारी (आज) या याचिकेवर सुनावणी करण्यात आली.

दोषींना कायदेशीर मार्ग वापरण्यासाठी न्यायालयाने पुढील ७ दिवासांची मुदत दिली आहे.

याआधी निर्भयाच्या दोषींची २ वेळा फाशी पुढे ढकलण्यात आली. दोन वेळा या दोषींचा फाशीनाामा जाहीर करण्यात आला होता. 

तसेच न्यायालयाने सुनावणीदरम्यान वारंवार होणाऱ्या फाशीच्या विलंबामुळे सरकारला खडेबोल सुनावले.

मुकेश सिंग, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर अशी या ४ दोषींची नावं आहेत. 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number