Saturday, February 14, 2026 01:54:27 PM

Sandeep Joshi: 'आता मला थांबायचंय...'; भाजप नेते संदीप जोशी यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा, फडणवीसांना पत्र लिहून सांगितलं कारण

देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे.

 sandeep joshi आता मला थांबायचंय भाजप नेते संदीप जोशी यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा फडणवीसांना पत्र लिहून सांगितलं कारण

Sandeep Joshi Letter: 'आता मला थांबायचंय...!' या एका वाक्याने विदर्भाच्या आणि विशेषतः भाजपच्या राजकारणात मंगळवारी मोठी खळबळ उडवून दिली. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. 13 मे रोजी आमदारकीची मुदत संपल्यानंतर आपण पुन्हा कोणत्याही पदाची अपेक्षा करणार नसल्याचे सांगत, त्यांनी 'तरुण रक्ताला जागा मिळायला हवी' असा उदात्त विचार मांडला आहे.

निर्णयामागची व्यथा आणि भूमिका

संदीप जोशी यांनी समाज माध्यमावर एक सविस्तर आणि भावूक पत्र प्रसिद्ध केले आहे. सध्याच्या राजकारणातील बदलती संस्कृती, सत्तेसाठी होणारी फोडाफोडी आणि निष्ठावंतांची होणारी कोंडी यावर त्यांनी या पत्रातून अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. राजकारण माझ्यासाठी समाजसेवेचे माध्यम होते, पण आताची वाढलेली स्पर्धा आणि संधीसाधूपणा अस्वस्थ करणारा आहे, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली आहे.

हेही वाचा - Sanjay Raut Slams BJP: ‘पंतप्रधानांनी आत्मचिंतन करायला हवं, त्यांना राजकीय इतिहासाची...’; राऊतांची भाजपवर घणाघाती टीका

पत्रातील महत्त्वाचे मुद्दे 

जोशी यांनी म्हटलं आहे की, 'मी आता 55 वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिकामी करून नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे हे माझे कर्तव्य आहे. पक्षाने मला चार वेळा नगरसेवक, महापौर आणि आमदार म्हणून मोठे केले. या ऋणांची जाणीव व्यक्त करताना त्यांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून हा निर्णय जाहीर केला आहे,' असे जोशी यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा - Bihar Bhawan In Mumbai : मुंबईत होणार बिहार भवन; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रकल्पासाठी 314 कोटींची मंजुरी

आमदारकीची मुदत संपल्यानंतर पक्ष देणार असेल तरीही पद स्वीकारणार नाही, असा निश्चय त्यांनी व्यक्त केला. राजकारण सोडले तरी 'दीनदयाल थाळी', 'सोबत पालकत्व प्रकल्प' आणि क्रीडा क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या ते अविरतपणे पार पाडणार आहेत.

"कुर्सी नहीं, क़ीमत बचाने चला हूँ..."

आपल्या पत्राचा शेवट त्यांनी एका अत्यंत अर्थपूर्ण कवितेने केला आहे. "कोणाची तरी वाट उजळावी, म्हणून मी स्वतः एक पाऊल मागे हटत आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. एका सामान्य कार्यकर्त्याला पद आणि प्रतिष्ठा देणाऱ्या भाजपच्या कार्यपद्धतीचा अभिमानही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या