IMD Weather Update: पेरण्या झाल्या, धरणं भरली पण आता पाऊस दांडी मारणार; ऑगस्ट महिन्याबाबत हवामान विभागाचा नवा इशारा जारी

5 ऑगस्टनंतर महाराष्ट्रातील पावसाचा जोर हळूहळू कमी होत जाईल, असा चिंताजनक अंदाज पुणे हवामान विभागाचे तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी वर्तवला आहे.

IMD Weather Update: पेरण्या झाल्या, धरणं भरली पण आता पाऊस दांडी मारणार; ऑगस्ट महिन्याबाबत हवामान विभागाचा नवा इशारा जारी

IMD Weather Update : यंदाच्या मान्सूनवर अल् निनोचा प्रभाव पडू शकतो, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) सुरुवातीलाच दिला होता. तोच अंदाज आता ऑगस्ट महिन्यात खरा ठरताना दिसत आहे. 5 ऑगस्टनंतर महाराष्ट्रातील पावसाचा जोर हळूहळू कमी होत जाईल, असा चिंताजनक अंदाज पुणे हवामान विभागाचे तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्यात मान्सूनवर अल् निनोचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवण्याची शक्यता असल्याने राज्यावरील पावसाचे सावट अधिक गढूळ झाले आहे.

जून-जुलैचा लहरी पाऊश आणि शेतकर्‍यांची धाकधूक
यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाल्यानंतर जूनच्या सुरुवातीला सलग तीन आठवडे पावसाने दांडी मारली होती. मात्र, जूनच्या शेवटी आणि जुलैच्या पूर्वार्धात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढला आणि शेतातील पेरण्यांनी वेग घेतला. जुलैच्या मध्यात पुन्हा दहा दिवसांची उघडीप मिळाल्याने पिके सुकू लागली होती, पण 20 जुलैनंतर पावसाने पुनरागमन केल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला होता. मागील वर्षाची तुलना करता यंदा राज्यात आत्तापर्यंत 6 टक्के अधिक पाऊस नोंदवला गेला आहे.

हेही वाचा – BMC Alert Monsoon Diseases : पावसाळ्यात मुंबईकरांच्या आरोग्यावर संकट! डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; प्रशासन अलर्ट

पुढील काही दिवसांची स्थिती आणि चिंतेचे ढग
गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघण्यास मदत झाली आहे. येत्या दोन दिवसांत पुणे आणि कोकणातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. मात्र, 5 ऑगस्टनंतर पावसाचे प्रमाण वेगाने कमी होणार असल्याने शेतीचे नियोजन कसे करायचे, असा मोठा प्रश्न पुन्हा एकदा बळीराजासमोर उभा राहिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number