ओमर अब्दुल्ला यांची भाजप सरकारवर टीका

जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यंंत्री ओमर अब्दुल्ला नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका करताना दिसतात. रविवारी झालेल्या निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावेळी जम्मू- काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका लोकसभेबरोबर न घेता पुढे ढकलण्यात आल्याने ओमर अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ओमर […]

ओमर अब्दुल्ला यांची भाजप सरकारवर टीका

जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यंंत्री ओमर अब्दुल्ला नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका करताना दिसतात. रविवारी झालेल्या निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावेळी जम्मू- काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका लोकसभेबरोबर न घेता पुढे ढकलण्यात आल्याने ओमर अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरच्या माध्यामातून सरकारवर टीका केल्याचे समजते आहे.

ओमर अब्दुल्ला नेमकं काय म्हणाले ?

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकींबरोबर विधानसभा होणार नाही.

तसेच विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकल्यामुळे मोदी भारतविरोधी शक्तींसमोर शरणागती पत्करली असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

बालाकोट आणि उरी  हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थित हाताळल्याचे प्रतिक नाही.

जम्मू – काश्मीरमधील परिस्थिती मोदींनी पूर्वीपेक्षा बिकट केली आहे.

विधानसभा निवडणुका पुढे ढकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, दहशतवादी आणि हुर्रियतसमोर नांगी टाकली आहे. त्यांची ५६ इंचाची छाती फ्लॉप गेल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

१९९६ पासून पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका वेळेत होणार नाही.

जम्मू – काश्मीरमधील परिस्थिती गंभीर असून ती चुकीच्या पद्धतीने हाताळली जात असल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट म्हटलं आहे.

मात्र पंतप्रधान मोदी जागतिक स्तरावर अपयशाची कबुली देतील असा कधी विचारही केला नव्हता असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

 

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number