Thursday, May 22, 2025 09:22:04 PM

OnePlus 13s लवकरच भारतात होणार लॉन्च; Snapdragon 8 Elite सह येणार दमदार स्मार्टफोन

OnePlus ने भारतात 13s मॉडेलचा टीझर सादर केला; दोन नवे रंग, दमदार Snapdragon 8 Elite प्रोसेसर.

oneplus 13s लवकरच भारतात होणार लॉन्च snapdragon 8 elite सह येणार दमदार स्मार्टफोन

मुंबई: OnePlus ने अखेर भारतात आपल्या नव्या स्मार्टफोनचा टीझर प्रदर्शित केला आहे. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये OnePlus 13T म्हणून सादर झालेला हा फोन आता भारतात OnePlus 13s या नावाने लॉन्च होणार आहे. टीझरमध्ये फोन दोन आकर्षक रंगांमध्ये दिसत आहे .Black Velvet आणि Pink Satin. मेटल फ्रेम आणि नवीन कस्टमायझेबल बटण या फोनचे मुख्य आकर्षण असणार आहे, जे पारंपरिक अलर्ट स्लायडरची जागा घेईल.

OnePlus कंपनीने फोनच्या डिझाइनबद्दल सांगताना म्हटले आहे की, Black Velvet रंग शांत रात्रीच्या आकाशाची आठवण करून देतो आणि एक शाश्वत आकर्षकता प्रदान करतो, तर Pink Satin हा ब्रँडचा पहिला गुलाबी फिनिश असून त्यात एक ताजेपणाचा, आनंददायक स्पर्श आहे. दोन्ही फिनिश प्रीमियम इन-हँड फील देण्यासाठी विशेष तयार करण्यात आले आहेत.

OnePlus 13s मध्ये OnePlus ने अनेक दमदार फिचर्स दिले आहेत. कंपनीने पुष्टी केली आहे की हा फोन Qualcomm च्या Snapdragon 8 Elite प्रोसेसरवर चालणार आहे, जो सध्या बाजारातील एक प्रगत आणि उच्च-कार्यक्षमतेचा चिपसेट मानला जातो. यामुळे गेमिंगपासून मल्टीटास्किंगपर्यंत सर्व गोष्टी अत्यंत वेगाने आणि सुरळीत चालतील.

हेही वाचा: महाराष्ट्र बोर्ड बारावी निकाल 2025 अपडेट: लवकरच जाहीर होणार निकाल; जाणून घ्या सविस्तर माहिती

या फोनमध्ये 6.32 इंचांचा डिस्प्ले असेल, जो तुलनेने कॉम्पॅक्ट असूनही फ्लॅगशिप लेव्हलचा परफॉर्मन्स देईल. त्यामुळे जास्त मोठा फोन नको असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरेल.

OnePlus च्या अधिकृत वेबसाईटवर  Notify Me वर क्लिक करून नोंदणी केल्यास वापरकर्ते एका खास स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. यात सहभागी झालेल्यांना OnePlus 13s किंवा OnePlus Buds Pro 3 जिंकण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत लिंक शेअर करून जास्तीत जास्त 8 OnePlus 13s फोन स्पर्धेच्या यादीत जोडू शकता.

नेहमीप्रमाणे, OnePlus 13s भारतात Amazon.in, OnePlus च्या अधिकृत ऑनलाईन स्टोअरवर आणि ऑफलाईन रिटेल स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लाँचिंगची नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, मात्र येत्या काही आठवड्यांत याबाबत अधिक तपशील मिळण्याची शक्यता आहे. OnePlus चाहत्यांमध्ये याबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. स्मार्टफोन क्षेत्रातील स्पर्धा लक्षात घेता, OnePlus 13s हा बाजारात एक जबरदस्त पर्याय ठरू शकतो.


सम्बन्धित सामग्री