Pandharpur Acid Attack: महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! पंढरपूरात अज्ञात इसमाकडून तरुणीवर ॲसिड हल्ला

Pandharpur Acid Attack: राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपूर शहरात एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी भागवत असे या पीडित तरुणीचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीने तिच्यावर ॲसिडसदृश द्रव्य फेकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. […]

Pandharpur Acid Attack: महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! पंढरपूरात अज्ञात इसमाकडून तरुणीवर ॲसिड हल्ला

Pandharpur Acid Attack: राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपूर शहरात एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी भागवत असे या पीडित तरुणीचे नाव आहे. अज्ञात व्यक्तीने तिच्यावर ॲसिडसदृश द्रव्य फेकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना घडल्यानंतर जखमी अवस्थेत तिला तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांकडून तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

हेही वाचा: Ahmedabad Crime: आई-बापच ठरले मारेकरी! मुलाच्या हव्यासापोटी चिमुकल्या मुली नकोश्या झाल्या; खासगी डायरीत नवस फेडण्याचा उल्लेख अन्…

विशेष म्हणजे, या घटनेच्या दिवशीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा होता. एकीकडे प्रशासनाची मोठी हालचाल सुरू असताना दुसरीकडे अशा प्रकारची घटना घडल्याने सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात आरोपी अज्ञात असल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana E-KYC : धक्कादायक! लाडकी बहिण ई-केवायसीच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी, नराधमावर गुन्हा दाखल

पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर मोठा आक्रोश व्यक्त केला आहे. मुलीच्या आईने भावनिक प्रतिक्रिया देत, 'माझ्या मुलीसारखं कुणावरही असं अमानुष कृत्य होऊ नये,' अशी विनंती केली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला आहे.

राज्यात यापूर्वीही अहिल्यानगर जिल्ह्यात ॲसिड हल्ल्याची घटना समोर आली होती. त्या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यातच पंढरपूरमधील हा नवा प्रकार समोर आल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सध्या या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांकडून तपास वेगात सुरू आहे. दरम्यान, महिलांच्या सुरक्षेबाबत अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number