Pandharpur Kartiki Ekadashi 2025: राज्यात दोन उपमुख्यमंत्री असताना विठ्ठलाची पूजा कोण करणार?मंदिर समिती संभ्रमात

पंढरपूर कार्तिकी एकादशी 2025 मध्ये राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने विठ्ठल महापूजेचा मान कोणाला मिळणार, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. मंदिर समितीने विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागितले आहे.

Pandharpur Kartiki Ekadashi 2025: राज्यात दोन उपमुख्यमंत्री असताना विठ्ठलाची पूजा कोण करणार?मंदिर समिती संभ्रमात

आषाढी एकादशीनंतर आता भक्तीचा दुसरा मोठा सोहळा कार्तिकी एकादशी 2025 जवळ येत आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात या दिवशी लाखो वारकरी एकत्र येतात. मात्र यंदा यात्रेच्या आधीच एक वेगळं गूढ चर्चेत आलं आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री असताना, विठ्ठलाच्या कार्तिकी महापूजेचा मान कोणाला मिळणार, हा प्रश्न मंदिर समितीपुढे निर्माण झाला आहे.
 
परंपरेनुसार, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. पण सध्याच्या परिस्थितीत राज्यात शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री असल्याने, या वेळी महापूजेचा मान कोणाला द्यायचा याबाबत मंदिर समिती संभ्रमात आहे.
 
याबाबत मंदिर समितीने राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाकडे अधिकृत विचारणा केली आहे. समितीचा निर्णय शासनाच्या आदेशावर अवलंबून असेल. एकदा शासनाकडून निर्देश आल्यानंतर, संबंधित उपमुख्यमंत्र्याला मंदिर समिती औपचारिक निमंत्रण देईल.

हेही वाचा : Today's Horoscope 2025 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार प्रगतीचा आणि आत्मविश्वास वाढवणारा
 
मागील काही वर्षांचा आढावा
 

2023 मध्येही राज्यात दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार  होते. त्या वेळी कार्तिकी पूजेचा मान फडणवीस यांना मिळाला होता. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या ऐवजी पुणे विभागीय आयुक्त कुलकुंडवार यांनी महापूजा केली होती. तसेच, 2017 मध्येही अशाच परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या परवानगीने चंद्रकांत पाटील यांनी पूजेचा मान मिळवला होता.
 
या वर्षी राज्यात जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, कार्तिकी पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांना मान देण्यासाठी निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेणे आवश्यक ठरणार आहे. आयोगाने परवानगी दिली तरच अधिकृत पूजेसाठी त्यांची उपस्थिती शक्य होईल.
 
पंढरपूरमध्ये दरवर्षीप्रमाणेच यंदाही लाखो वारकरी, दिंड्या आणि भजन मंडळे दर्शनासाठी येतील. मात्र, कार्तिकी एकादशीच्या विठ्ठल पूजेचा मान अखेर कोणाला मिळतोय? अजित पवार की एकनाथ शिंदे?  हे पाहणे आता राज्यातील भक्त आणि राजकीय वर्तुळासाठी तितकेच उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा : Ind v Pak Women World Cup 2025 : महिला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची हार! भारताने 88 धावांनी मिळवला विजय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number