मुंबई: राष्ट्रवादी पक्षाच्या 26 व्या वर्धापनदिनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरुन राजीनामा देण्याचे सुतोवाच दिले होते. यानंतर शरद पवार गटाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? अशा चर्चा रंगल्या. यात शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा आहे. तर नव्या चेहऱ्यांमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाचाही विचार केला जात असल्याच्या चर्चा आहेत.
जयंत पाटील यांनी पायउतार होण्याचे सूतोवाच केल्यामुळे शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री शशिकांत शिंदे किंवा राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. नव्या चेहऱ्यांमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नव्या नेतृत्वाकडे द्यावी, अशी विनंती पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. सध्याच्या परिस्थितीत पवार यांचा पाटील यांच्यावर सर्वाधिक विश्वास असल्याने त्यांच्याकडील नेतृत्व कायम ठेवले आहे.
हेही वाचा : आम्ही मराठी माणसासाठी काम करत नाही का?, भरत गोगावलेंची टीका
पवार गटात तरुण नेतृत्वाला संधी मिळावी, यासाठी आमदार रोहित पवार यांचा आग्रह आहे. पवार आणि पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष सर्वश्रुत आहे. पाटील यांनी मेळाव्यात पदापासून बाजूला होत असल्याचा सूर लावला, तेव्हा कार्यकत्यांकडून 'नाही नाही'च्या घोषणा देण्यात आल्या. तरी पक्षातील एक गट त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री शशिकांत शिंदे तसेच राजेश टोपे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. टोपे यांनी कोरोनाकाळात आरोग्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा उल्लेख शरद पवार गटाकडून केला जात आहे.