व्हायरल फोटोने अफवांना दिला जन्म

राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याची चर्चा सुरू आहे. या भेटीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमुळे राज्यात पुन्हा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आता या फोटोवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौन सोडले आहे. पवार भेटीचा फोटो हा जुना असून त्याच्या अलिकडे कोणतीही भेट झाली […]

व्हायरल फोटोने अफवांना दिला जन्म

राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याची चर्चा सुरू आहे. या भेटीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमुळे राज्यात पुन्हा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, आता या फोटोवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौन सोडले आहे. पवार भेटीचा फोटो हा जुना असून त्याच्या अलिकडे कोणतीही भेट झाली नसल्याचं स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनीच स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून या फोटोबाबत असे म्हणाले आहेत की….
शरद पवार यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नसल्याने अफवांवर विश्वास ठेवू नये असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत अभूतपूर्व बंड केले आहे. शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार आपल्या बाजूला वळवले आहेत. हे ४० आमदार आणि अपक्षांसह ५० आमदारांचे बळ शिंदे यांनी आपल्या पाठिशी उभे केले. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात सध्या ११ खासदार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number