पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यावर वैष्णवीचा बळी घेतल्याचा आरोप आहे. हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेंच्या अंगवार मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळे वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येवर प्रश्न निर्माण होत आहेत.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यावर वैष्णवी हगवणेची बळी घेतल्याचा आरोप होत आहे. राजेंद्र हगवणे हे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुकाध्यक्ष आहेत. त्यामुळेच सून वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी त्यांना अटक होत नाहीअशी चर्चा आहे. मात्र या चर्चेत तथ्य नाही, पोलिसांची तीन पथकं त्यांच्या शोधात असल्याचा दावा बावधन पोलिसांनी केला आहे. मात्र वैष्णवीची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा, तिला मारहाण केल्याचा, शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. त्यामुळे सुनेला आत्महत्येस प्रवृत्त आणि हुंडाबळी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणेंवर आरोप होत आहे.
हेही वाचा : Unseasonal Rain: Aamir Hamza: लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरण
वैष्णवी हगवणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेंची सून आहे. 16 मे रोजी बेडरुममध्ये गळफास घेऊन तिने आत्महत्या केली असून मृत्यूपूर्वी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्या आहेत. हुंड्यासाठी वैष्णवीची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात सासरा,सासू, नवरा, दीर आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अद्यापही फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. 27 नोव्हेंबर 2023 मध्येही विष पिऊन वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. लग्नात वैष्णवीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी घेण्यात आली होती.