‘राजकीय पक्ष आपली पोळी भाजत आहेत’ – अनिल परब

‘राजकीय पक्ष आपली पोळी भाजत आहेत’ – अनिल परब

  राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याबाबत आवाहन केले आहे. आंदोलन मागे घेऊन पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला विरोधी पक्षनेत्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या संपात राजकीय पक्ष आपली पोळी भाजत असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

  एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी संप पुकारला आहे. तसेच विरोधी पक्षाने या संपास पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे एसटी कर्मचाऱ्यांना भडकवत असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार चर्चेच्या तयारीत असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले. ते म्हणाले, विलिनीकरणाची मागणी मान्य करणे तूर्तास शक्य नाही. न्यायालयाने गठीत केलेल्या समितीच्या निर्णयाची प्रतिक्षा करणार असल्याचे परब यांनी सांगितले.

 एसटीचे काही कर्मचारी कामाला पुन्हा रुजू होण्यास तयार आहेत. या कर्मचाऱ्यांनी सरकारला सहकार्य केले तर कामावर येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल असे अनिल परब म्हणाले. तसेच कोरोनाच्या काळातील नुकसानाच्या पार्श्वभूमीवर आणखी नुकसान होऊ नये त्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन अनिल परब यांनी केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version