बंदर व गोदी कामगारांना भरघोस पगारवाढीचा करार संपन्न झाला आहे.
By :
Jai Maharashtra News Updated On:
मुंबई : बंदर व गोदी कामगारांना भरघोस पगारवाढीचा करार संपन्न झाला आहे. इंडियन पोर्ट असोसिएशन व सहा मान्यताप्राप्त कामगार महासंघ यांच्यामध्ये समझोता करार झाला. द्विपक्षीय वेतन समितीच्या बैठकीत करार झाला. सर्व बंदरांचे चेअरमन व सहा फेडरेशनच्या कामगार नेत्यांमध्ये करार झाला.द्विपक्षीय वेतन समितीचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठकीत करार झाला. बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२६ असा ५ वर्षाचा पगारवाढीचा वेतन करार करण्यात आला.
बंदर व गोदी कामगारांना या करारातून नेमकं काय मिळालं?
या वेतन करारानुसार ३१ डिसेंबर २०२१ च्या मूळ पगारात १ जानेवारी २०२२ चा ३० टक्के महागाई भत्ता विलीन कऱणार
त्यावर ८.५० टक्के फिटमेंट दिले जाणार
कामगारांना ३० टक्के घरभाडे भत्ता मिळणार
नोकरीत असलेल्या कामगारांना प्रति महिना ५०० रुपये विशेष भत्ता
तीन टक्के वार्षिक पगारवाढही मंजूर
एक जानेवारी २०२२ पासून सध्याच्या प्रथेनुसार प्रभावी वेतनश्रेणी तयार केल्या जाणार
पोर्ट वसाहतीमध्ये राहणाऱ्या कामगारांना कमीत कमी दोन हजार ८३० रूपये व जास्तीत जास्त १३ हजार ५९० रूपयांची वाढ
वसाहतीत न राहणाऱ्या कामगारांना किमान पाच हजार ४१० रूपये व कमाल २५ हजार ५०० रुपयांची पगारवाढ
निवृत्त झालेल्या कामगारांच्या निवृत्ती वेतनात किमान १ हजार १६५ तर कमाल ६ हजार ५४५ रुपये वाढ