Death of a Pregnant Woman: जगभरात दर दोन मिनिटांनी एका गरोदर महिलेचा मृत्यू होतो, असा धक्कादायक खुलासा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2023 च्या अहवालात केला आहे. 2023 मध्ये सुमारे 2.60 लाख महिलांनी गर्भधारणा, प्रसूती किंवा प्रसूतीनंतरच्या काळात आपले प्राण गमावले. हा आकडा संपूर्ण जगाला गंभीरपणे विचार करायला लावणारा आहे.
गर्भधारणेतील मृत्यू म्हणजे काय?
डब्ल्यूएचओनुसार, गर्भधारणा सुरू असताना, प्रसूतीच्या वेळी किंवा प्रसूतीनंतर 42 दिवसांच्या आत गर्भधारणेशी संबंधित कारणांमुळे एखाद्या महिलेचा मृत्यू होणे म्हणजे गर्भधारणेतील मृत्यू. अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट्स (ACOG) यांच्या मते, काही वेळा ही मर्यादा प्रसूतीनंतर एक वर्षापर्यंत वाढवली जाते.
2023 मध्ये जागतिक गर्भधारणेतील मृत्यू दर (Maternal Mortality Ratio - MMR) 1,00,000 जीवंत जन्मांवर 197 इतका होता. कमी उत्पन्न देशांमध्ये हा दर 346 तर उच्च उत्पन्न देशांमध्ये केवळ 10 इतका होता.
गर्भधारणेतील मृत्यू होण्याची प्रमुख कारणे
1. रक्तस्राव (Postpartum Hemorrhage): प्रसूतिनंतर जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होणे ही गर्भधारणेतील मृत्यूची सर्वात मोठी कारणे आहे. भारत, पाकिस्तान आणि इतर विकसनशील देशांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
2. उच्च रक्तदाब विकार (Hypertensive Disorders): प्रीक्लेम्पसिया आणि एक्लेम्पसिया सारखे विकार डोळे, मूत्रपिंड आणि इतर अवयवांना नुकसान करतात आणि गंभीर परिणाम होऊ शकतात.
3. मानसिक आरोग्य समस्या (Mental Health Conditions): प्रसवोत्तर नैराश्य, चिंता व मानसिक तणाव यामुळेही अनेक महिलांचे जीव जातात. मानसिक आरोग्य तपासणी आणि उपचार अत्यंत आवश्यक आहेत.
4. संसर्ग (Infections): प्रसूतिनंतरच्या काळात संसर्गामुळेही मृत्यू होतो. यामागे स्वच्छतेचा अभाव, प्रशिक्षित आरोग्यकर्मींची कमतरता आणि औषधांची उपलब्धता कमी असणे कारणीभूत ठरते.
5. हृदयविकार आणि कार्डिओमायोपथी (Cardiovascular Conditions): गर्भधारणेदरम्यान रक्तप्रवाह वाढल्याने हृदयावर ताण येतो. त्यामुळे हृदयविकारामुळेही मृत्यू होण्याची शक्यता वाढते.
गर्भधारणेतील मृत्यू कमी करण्याचे उपाय
गर्भधारणा दरम्यान नियमित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.
प्रसूतीदरम्यान प्रशिक्षित डॉक्टर व आरोग्यकर्मींची उपस्थिती अनिवार्य आहे.
मानसिक आरोग्याची देखील तपासणी करावी आणि आवश्यक ते उपचार द्यावेत.
महिलांना व त्यांच्या कुटुंबियांना गर्भधारणेसंबंधी धोके व त्यांची लक्षणे समजावून सांगणे गरजेचे आहे.
सरकारी यंत्रणा व सामाजिक संघटना यांना आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी अधिक कार्य करावे लागेल.
गर्भधारणेतील मृत्यू ही फक्त आरोग्याची समस्या नाही, तर ती सामाजिक आणि मानवीय जबाबदारी आहे. योग्य वेळी उपचार, जागरूकता आणि सजगता यामुळे हजारो महिला वाचू शकतात. प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भधारणा आणि प्रसूतीचा अनुभव मिळावा यासाठी सतत प्रयत्न आवश्यक आहेत.