Pune Ganpati Visarjan : पुणेकरांसाठी मोठी बातमी! बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी 41 तास धावणार पुणे मेट्रो; 6 स्थानकांवर बदलले नियम

पुण्यात विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची शक्यता असल्याने मेट्रो सेवा आणि प्रवाशांच्या सोयीसंदर्भात विशेष नियोजन करण्यात आले आहे.

Pune Ganpati Visarjan : पुणेकरांसाठी मोठी बातमी! बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी 41 तास धावणार पुणे मेट्रो; 6 स्थानकांवर बदलले नियम
बाप्पाच्या विसर्जन विसर्जनासाठी पुणे मेट्रो सज्ज!

आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने राज्यभरात गणरायाच्या विसर्जनाची जय्यत तयारी सुरू असून, ठिकठिकाणी भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत.

Ganesh Visarjan 2026 : विसर्जनानंतर अर्धवट मूर्तींचे फोटो काढाल तर सावधान! धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

याचपार्श्वभूमीवर पुण्यातही गणेश विसर्जनासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह असून, शहरातील विविध विसर्जन घाट, मिरवणुकीचे मार्ग आणि प्रमुख चौकांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची शक्यता असल्याने मेट्रो सेवा आणि प्रवाशांच्या सोयीसंदर्भात विशेष नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी बाप्पाला निरोप देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बाहेर पडणाऱ्या पुणेकरांसाठी मेट्रो सलग 41 तास अखंडपणे धावणार आहे. तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि चेंगराचेंगरीसारखे प्रकार टाळण्यासाठी शहरातील 6 स्थानकांवर प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र गेट निश्चित करण्यात आले आहेत.

हेही वाचा- Mumbai Ganesh Visarjan : लालबाग-परळमध्ये बाप्पाच्या निरोपाची धूम! महाआरतीनंतर मिरवणूक, मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त

‘या’ स्थानकांवर एन्ट्री-एक्झिट बदल

पीसीएमसी (PCMC)
प्रवेश : फिनोलेक्स चौक बाजू (गेट क्र. 1 व 4)
निर्गमन (Exit): पीसीएमसी भवन बाजू (गेट क्र. 2 व 3)

डेक्कन जिमखाना 
प्रवेश : वनाज बाजू (गेट क्र. 1)
निर्गमन : रामवाडी बाजू (गेट क्र. 2 व 3)

छत्रपती संभाजी उद्यान 
प्रवेश : वनाज बाजू (गेट क्र. 1, 3 व 4)
निर्गमन : रामवाडी बाजू (गेट क्र. 2)

एसएनडीटी (SNDT)
प्रवेश : वनाज बाजू (गेट क्र. 1 व 4)
निर्गमन : रामवाडी बाजू (गेट क्र. 2)

गरवारे कॉलेज 
प्रवेश : वनाज बाजू (गेट क्र. 1 व 4)
निर्गमन : रामवाडी बाजू (गेट क्र. 3)

सिव्हिल कोर्ट / पीएमसी (PMC)
प्रवेश : रामवाडी बाजू (गेट क्र. 3)
निर्गमन : वनाज बाजू (गेट क्र. 1)

हेही वाचा- Solapur News : सोलापुरात गणेश विसर्जनाची लगबग; भक्तांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने घेतला मोठा निर्णय

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात होणारी भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवास करता यावा यासाठी पुणे मेट्रो प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे गणेशभक्तांना विसर्जन मिरवणुका आणि शहरातील विविध भागांमध्ये पोहोचण्यासाठी मेट्रोचा मोठा आधार मिळणार आहे. दरम्यान, विसर्जन मिरवणुकांदरम्यान नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number