पुणे : पिंपरी-चिंचवड सह पीएमआरडीएच्या हद्दीत घर घेण्याचं स्वप्न पाहणारऱ्यांनी म्हाडाच्या नव्या लॉटरीकडे आता धाव घेतली आहे. म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेल्या तब्बल 4 हजार 462 घरांसाठी फक्त काही दिवसांत 97 हजार 701 इतके अर्ज आले आहे, त्यामुळे प्रशासनालाही आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. आता कागदपत्र पडताळणीच्या कामात येणारा उशीर तसेच नागिरांचा वाढता प्रतिसाद पाहता म्हाडाने अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे.
शेवटची संधी कधीपर्यंत?
मिळालेल्या माहितीनुसार,मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी आता अर्ज भरण्याची मुदत ही एका महिन्याने वाढवली आहे. याआधी 15 सप्टेंबर ही अंतिम तारीख ठरवण्यात आलेली होती. मात्र, आता अर्जदरांना 15 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वप्नातील घरासाठी अर्ज करता येणार आहे. आतापर्यंत पाहिलं तर 52 हजार 276 जणांनी अनामक रक्कम ही भरली आहे. अनामत रक्कमेतून म्हाडाला तब्बल 1.62 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालेले आहे.
हेही वाचा-आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी गॅस सिलिंडर मिळणार फ्री; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
कुठे किती घरं?
या लॉटरीमध्ये पुणे मनपामध्ये 1468, पिंपरी-चिंचवड शहरात 1406 तसेच पीएमआरडीए क्षेत्रामध्ये 1588 इतकी घरे उपलब्ध आहे.
पुढील वेळापत्रक असे
अनामत रक्कम भरण्याची आता अंतिम तारीख ही 15 ऑक्टोबर असून, प्रारुप यादी 12 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. तर दावे-हरकतीसाठी 14 नोव्हेंबरपर्यंत वेळ असणार आहे. अंतिम यादी ही 20 नोव्हेंबरला येणार आहे आणि महा-सोडत 26 नोव्हेंबर या दिवशी सकाळी साधारण 11 वाजता निघेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.