Pune Nasrapur Crime : नसरापूरला हादरवणाऱ्या त्या घटनेच्या पुनर्रचनेची प्रक्रिया, मध्यरात्री 600 पोलिसांच्या ताफ्यासह नराधम घटनास्थळी दाखल; सांगितला गुन्ह्याचा घटनाक्रम

आरोपीने चिमुकलीला खेळत असताना नेमके कोठून सोबत घेतले आणि गोठ्यात कशा प्रकारे नेले, याची सविस्तर माहिती पोलिसांनी 'क्राईम सीन रिक्रिएशन'च्या माध्यमातून घेतली.

Pune Nasrapur Crime : नसरापूरला हादरवणाऱ्या त्या घटनेच्या पुनर्रचनेची प्रक्रिया, मध्यरात्री 600 पोलिसांच्या ताफ्यासह नराधम घटनास्थळी दाखल; सांगितला गुन्ह्याचा घटनाक्रम

Pune Nasrapur Crime : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या निर्घृण अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र संताप व्यक्त करत आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री 3 ते 5 या वेळेत घटनास्थळी नेले. गावातील वातावरण प्रचंड तणावपूर्ण असल्याने आणि नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होऊ नये, यासाठी पोलिसांनी पहाटेची वेळ निवडली होती. या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 500 ते 600 पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

गोठ्यात नेले आणि अत्याचार केला: गुन्ह्याच्या रिक्रिएशनमधून खुलासा
आरोपीने चिमुकलीला खेळत असताना नेमके कोठून सोबत घेतले आणि गोठ्यात कशा प्रकारे नेले, याची सविस्तर माहिती पोलिसांनी ‘क्राईम सीन रिक्रिएशन’च्या माध्यमातून घेतली. या पाहणीचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून, पोलिसांनी आरोपीला सोबत घेऊन प्रत्येक हालचालीची बारकाईने तपासणी केली. सुट्टीसाठी आजीच्या गावी आलेल्या या चिमुरडीला 1 मे रोजी 65 वर्षांच्या नराधमाने गाठले होते. त्यानंतर तिला गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिची हत्या करण्यात आली.

शवविच्छेदन अहवालातील हृदयद्रावक वास्तव
ससून रुग्णालयाने सादर केलेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून या गुन्ह्याची भीषणता स्पष्ट झाली आहे. नराधम भीमराव कांबळे याने चिमुकलीचे ओरडणे बंद करण्यासाठी तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता. इतकेच नाही तर, ती मृत पावली आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याने तिच्या छातीत जोरात बुक्की मारली. आरोपीने तिला दगडाने ठेचून ठार केले आणि तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. या निर्घृण कृत्यामुळे पोलिसांसह तपास यंत्रणाही हादरून गेल्या आहेत.

हेही वाचा – Nasrapur Case: ‘तालुक्यातचं काय पुणे जिल्ह्यातही कुठलाचं वकील त्या नराधमाचं आरोपपत्र घेणार नाही’; बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी मांडली ठाम भूमिका

आजीच्या घरी सुट्टीसाठी आली होती चिमुकली
पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत पुण्यात वास्तव्यास होती. उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे ती नसरापूर येथे आपल्या आजीकडे राहायला आली होती. अंगणात खेळत असतानाच आरोपीची नजर तिच्यावर पडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपीला पकडून बेदम चोप दिला होता आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पोलीस कोठडीत असतानाही या 65 वर्षांच्या आरोपीला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे त्याच्या वागणुकीवरून दिसून येत आहे.

कठोर कारवाईसाठी पोलिसांची पावले
गुन्ह्याचा तपास अधिक मजबूत करण्यासाठी पोलिसांनी इन-कॅमेरा तपासणी आणि न्याय वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेतली आहे. मध्यरात्रीच्या या गुप्त मोहिमेद्वारे पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. 500 हून अधिक पोलिसांच्या उपस्थितीत पार पडलेली ही प्रक्रिया शांततेत पार पडली. आता या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी नसरापूरसह संपूर्ण पुणे जिल्ह्यातून केली जात आहे.

हेही वाचा – Akola Crime: पुण्यानंतर आता अकोला हादरलं! आई-वडील मजुरीला गेल्यानंतर 60 वर्षीय नराधमाने 10 वर्षांच्या चिमुरडीसोबत केलं नको ते कृत्य 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number