Wednesday, November 19, 2025 01:29:22 PM

Pune University Flyover: युनिव्हर्सिटी चौकातील उड्डाणपूल प्रकल्प पूर्णतेकडे; प्रवाशांना मिळणार दिलासा

पुण्यातील गणेशखिंड रोडवरील युनिव्हर्सिटी चौक उड्डाणपूलाचा बाणेर–शिवाजीनगर मार्ग नोव्हेंबरमध्ये खुला होणार असून डिसेंबरपर्यंत उर्वरित मार्गही सुरू होणार आहेत.

pune university flyover युनिव्हर्सिटी चौकातील उड्डाणपूल प्रकल्प पूर्णतेकडे प्रवाशांना मिळणार दिलासा

पुणे : गणेशखिंड रोडवरून शिवाजीनगर ते बाणेर आणि पाषाण दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकर तर्फे उभारण्यात येणाऱ्या युनिव्हर्सिटी चौक उड्डाणपूलाचा बाणेर -शिवाजीनगर दिशेचा भाग नोव्हेंबरमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे. उर्वरित दोन मार्ग शिवाजीनगरहून पाषाण आणि बाणेरकडे जाणारा रस्ता डिसेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणपूलाच्या सर्व बाजूंच्या कामाचा अंतिम टप्पा सुरू असून, उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत. या मार्गावर दररोज हजारो वाहने धावत असल्याने सर्व मार्ग खुले झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांना चांगल्या प्रवासाचा अनुभव मिळेल.

युनिव्हर्सिटी चौक परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत प्रकल्पांमुळे सध्या वाहतूक विस्कळीत झाली आहे. PMRDA उड्डाणपूल उभारत असताना पुणे महानगरपालिका गणेशखिंड रोड रुंदीकरणाचं काम करत आहे. ऑगस्ट महिन्यात औंध–शिवाजीनगर दिशेचा एक मार्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, उर्वरित रॅम्प आणि विंग्सचे काम अद्याप सुरू आहे.

हेही वाचा: Gold Price Today: आज पुन्हा सोन्याच्या भावात घसरण, पण चांदी झाली महाग; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सांगितले की, एका भागाच्या सुरूवातीने काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही SB रोड, औंध, बाणेर आणि पाषाण दिशेने वाहतुकीची अडचण कायम आहे. दुसरे प्रवासी म्हणाले, “पावसाळ्यात युनिव्हर्सिटी चौक पार करणे मोठं आव्हान होतं. आता उर्वरित मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवास जलद होईल, अशी अपेक्षा आहे.”

गणेशखिंड रोड रुंदीकरणाचे कामही वेगाने पूर्ण होणार आहे. PMC ने सांगितले की, नोव्हेंबरपासून RBI चौक ते सांचिती हॉस्पिटल दरम्यानचा उर्वरित रस्ता रुंद करण्याचं काम सुरू होईल. काही जमीन ताब्यात घेतली असून सुमारे 50 भूखंडांच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. याआधी RBI चौक ते युनिव्हर्सिटी चौक या भागाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

उड्डाणपूल आणि रस्ता दोन्ही पूर्ण झाल्यास हा मार्ग शहरातील सर्वात जलद वाहतूक मार्गांपैकी एक ठरेल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये आहे.

हेही वाचा: Ghaziabad Firing Incident: रात्रीचा थरार; या भाजप नगरसेविकेच्या कारवर अचानक झाला गोळीबार...


सम्बन्धित सामग्री