Sunday, July 13, 2025 09:34:08 AM

'पुष्पा' स्टाईल सुगंधी तंबाखूची वाहतूक; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

मिरजेमध्ये 'पुष्पा' स्टाईलने सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक उघड; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक, ट्रकमधून शेतीमालाच्या आडून तंबाखू साठा लपवला होता.

पुष्पा स्टाईल सुगंधी तंबाखूची वाहतूक 11 लाखांचा मुद्देमाल जप्त दोघांना अटक

सांगली: मिरजेतील नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील निलजी बामणी दरम्यान पुलाखाली ट्रक मधून सुगंधी तंबाखू उतरवला जात असल्याची माहिती मिळताच महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अचानक छापा टाकला. या कारवाईत तब्बल एक लाखाच्या सुगंधी तंबाखूसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: Big decision of the Union Cabinet: केंद्रीय कॅबिनेट बैठकीत पुणे मेट्रो टप्पा 2 ला दिली मंजूरी

ही अवैध वाहतूक 'पुष्पा' चित्रपटातील दृश्यासारखी करण्यात आली होती. ट्रकमधील लिंबू आणि इतर शेतीमालाच्या पोत्याच्या आडून सुगंधी तंबाखू लपवून ठेवण्यात आला होता. कर्नाटकहून ही तंबाखू मिरजमध्ये आणण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तंबाखू मिरज व कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात विक्रीसाठी नेण्यात येत होती.या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास महात्मा गांधी चौकीचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अवैध तंबाखू विक्रीच्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ऑगस्टपासून शेतकऱ्यांना मिळणार व्हॉट्सॲपवर सातबारा

कश्या प्रकारे करत होते वाहतूक?
पुष्पा चित्रपटात अल्लू अर्जुन म्हणजेच पुष्पा ज्याप्रकारे लपून छापून लाल चंदनाची तस्करी करत असतो त्याच प्रकारे यामध्ये सुद्धा आरोपी लिंबू  आणि इतर शेतमालाच्या वस्तू आडून ही तस्करी करत होते. म्हणून ह्याला पुष्पा स्टाईलची तस्करी म्हटले जात आहे. 

अंमली पदार्थ, गुटखा वाहतूक व विक्री करण्यास राज्यात बंदी घातली गेली आहे तरीसुद्धा असे प्रकार वारंवार घडताना दिसून येतात. छुप्या पद्धतीने सुरु असणाऱ्या अनेक वाहतूक आणि विक्री वर पोलिसांनी अनेक वेळा आळा घालायचा प्रयन्त केला आहे; कारवाई सुद्धा करण्यात येते परंतु हे प्रकार अजूनही थांबले नाही आहेत यासाठी पोलिसांनी त्यांचे नियम अधिक कठोर करणे तसेच सतर्क राहणे गरजेचे आहे.
 


सम्बन्धित सामग्री