पुणे : निलेश चव्हाण यांच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली आहे. यावेळी निलेशचा भाऊ आणि वडीलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच पुणे पोलिसांकडून चव्हाणचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून फरार निलेश चव्हाणचा शोध सुरु आहे. निलेश हा करिष्मा हगवणे हिचा मित्र आहे. वैष्णवी हगवणे हिच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या फरार निलेश चव्हाणचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. निलेश चव्हाणला आज हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. बाळाचा ताबा देण्यास त्याने नकार दिला होता. बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ज्यावेळी कस्पटे कुटुंबीय वैष्णवीच्या बाळाला घेण्यासाठी निलेशच्या घरी गेले. तेव्हा त्याने बाळ देण्यास नकार दिला आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यांना हकलून लावले. त्यामुळे त्याचा शस्त्र परवाना अखेर रद्द करण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्तांकडून त्याचा परवाना रद्द करण्यात आला.
हेही वाचा : 'विवाहितेला विष पाजून...'; सोलापुरात विवाहितेला काठी आणि रॉडने मारहाण
विकृत निलेश चव्हाणचे कारनामे
निलेश चव्हाण स्पाय कॅमेऱ्यानं स्वत:च्याच पत्नीचं आक्षेपार्ह चित्रीकरण करत होता. 2019 साली वारजे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. बेडरूमच्या सिलिंग फॅनला स्पाय कॅमेरा लावायचा. एवढंच नाही तर एसीलाही स्पाय कॅमेरा जोडलेला होता. शरीर संबंधाचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करायचा. निलेशच्या लॅपटॉपमध्ये पत्नीला आक्षेपार्ह व्हिडीओ आढळले. इतर मुलींसह शरीरसंबंधाचेही व्हिडीओही रेकॉर्ड करायचा. पत्नीनं जाब विचारताच निलेशनं चाकू दाखवत धमकावलं,गळाही दाबला. निलेशच्या पत्नीनं सासू-सासऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर उलट तिचाच सासू-सासऱ्यांकडून छळ सुरू झाला. निलेशसह त्याच्या नातेवाईकांवर 14 जून 2022 ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. निलेशचा अटकपूर्व जामीन पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला. तरीही वारजे पोलिसांकडून निलेशला अभय देण्यात आले. अखेर मुंबई हायकोर्टाकडून निलेशला अटकपूर्व जामीन मिळाला. निलेश हा शंशाकची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र आहे. निलेशचा बांधकाम,पोकलेन मशीनचा व्यवसाय आहे.