लखलखीत दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघाला रायगड किल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड स्वराज्याची राजधानी अशी ओळख असलेल्या किल्ले रायगडावर पाडव्याच्या मुहुर्तावर आव्हान गिर्यारोहक या संघटनेसह शिवभक्तांनी दिपोत्सव साजरा केला. पालखी दरवाजा, राजदरबार, मेघडंबरी, होळीचा माळ, जगदीश्वर मंदीर, समाधीस्थळ, नगारखाना इत्यादी प्रमुख ऐतिहासिक स्थळांसह ठिकठिकाणी हजारो पणत्या पेटवून दिवाळी साजरी करण्यात आली. जागोजागी पेटलेल्या दिव्यांमुळे संपूर्ण रायगड परिसर उजळून निघाला होता. गडद अंधार दाट […]

लखलखीत दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघाला रायगड किल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

स्वराज्याची राजधानी अशी ओळख असलेल्या किल्ले रायगडावर पाडव्याच्या मुहुर्तावर आव्हान गिर्यारोहक या संघटनेसह शिवभक्तांनी दिपोत्सव साजरा केला. पालखी दरवाजा, राजदरबार, मेघडंबरी, होळीचा माळ, जगदीश्वर मंदीर, समाधीस्थळ, नगारखाना इत्यादी प्रमुख ऐतिहासिक स्थळांसह ठिकठिकाणी हजारो पणत्या पेटवून दिवाळी साजरी करण्यात आली. जागोजागी पेटलेल्या दिव्यांमुळे संपूर्ण रायगड परिसर उजळून निघाला होता. गडद अंधार दाट धुके आणि गार वारा यामुळे वातावरण भारावले होते.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number