Central Railway Holi Special Train Service : होळी आणि शिमग्याच्या सणाला कोकणासह गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एकूण 34 विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून, या गाड्यांचे आरक्षण 16 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आले आहे.
शिर्डी आणि बिकानेर मार्गावरील फेऱ्या वाढल्या
साईभक्तांसाठी महत्त्वाची असलेली ट्रेन क्रमांक 04715 बिकानेर-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडी आता 28 मार्च 2026 पर्यंत दर शनिवारी धावणार आहे. यापूर्वी ही गाडी केवळ 28 फेब्रुवारी पर्यंत अधिसूचित होती. तसेच, परतीसाठी ट्रेन क्रमांक 04716 साईनगर शिर्डी-बिकानेर विशेष गाडी आता 29 मार्च 2026 पर्यंत दर रविवारी चालवण्यात येईल. यामुळे उत्तर भारतातून शिर्डीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
हेही वाचा - Bhandup Railway Station : ''त्या'' घटनेनंतर मोठा निर्णय! भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना प्रवेशबंदी; सीमारेषा ओलांडल्यास इतका दंड
पुणे आणि सोलापूरकरांसाठी मोठी दिलासा
पुणे आणि सोलापूर विभागातील प्रवाशांसाठीही रेल्वेने मुदतवाढ दिली आहे. ट्रेन क्रमांक 04725 हिसार-खडकी साप्ताहिक विशेष आता 29 मार्च 2026 पर्यंत दर रविवारी, तर परतीची 04726 खडकी-हिसार विशेष 30 मार्च 2026 पर्यंत दर सोमवारी धावेल. सोलापूरसाठी ट्रेन क्रमांक 09627 अजमेर-सोलापूर विशेष 25 मार्च पर्यंत दर बुधवारी आणि परतीची 09628 सोलापूर-अजमेर विशेष 26 मार्च 2026 पर्यंत दर गुरुवारी उपलब्ध असेल.
दौंड-अजमेर मार्गावरही जादा गाड्या
होळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी अजमेर-दौंड साप्ताहिक विशेष गाडीची सेवा वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक 09625 अजमेर-दौंड विशेष आता 26 मार्च पर्यंत दर गुरुवारी धावेल, तर ट्रेन क्रमांक 09626 दौंड-अजमेर विशेष गाडीची मुदत 27 मार्च 2026 पर्यंत दर शुक्रवारी वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व गाड्यांचे वेळापत्रक, थांबे आणि डब्यांची रचना यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ टाळण्यास मदत होईल.
हेही वाचा - Holi Special Train: खुशखबर! पुण्यातून सुटणार ''होळी स्पेशल'' रेल्वे गाड्या, तुमच्या गावासाठी जादा ट्रेन्स आहेत का ?