जर कन्फर्म तिकीट प्रवाशांना मिळालं की प्रवास हा निश्चित मानला जातो. मात्र, प्रत्यक्षात बऱ्याचदा वेगळंच चित्र असतं. तिकीट हे कन्फर्म असूनही सीट मिळत नाही आणि प्रवाशांना उभं राहूनच संपूर्ण प्रवास करावा लागतो. अशा प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, आता तुम्हाला रेल्वेकडून थेट नुकसान भरपाई मिळू शकते, अशी माहिती सध्या समोर आलेली आहे.
रेल्वेला द्यावी लागू शकते भरपाई
सणासुदीच्या दिवसात ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते. काही प्रवासी हे दुसऱ्यांदा आरक्षित सीटवर बसतात आणि उठतच नाहीत. तर बऱ्याच वेळा गर्दीमुळे आपल्या कोचपर्यंत पोहोचणेच कठी होते. अशाच प्रकरणांमध्ये ग्राहक आयोगाने थेट रेल्वेला दणका दिलेला आहे. मे 2026 मध्ये बिहारच्या भोजपूर ग्राहक आयोगाने कन्फर्म तिकीट असूनही सीट न मिळालेल्या अशा काही प्रवाशांच्या बाजूने निकाल देत रेल्वेला दोषी ठरवले आहे आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत.
हेही वाचा- रेल्वेचा कडक नियम! आता कानाला हेडफोन नाही तर खिशाला भुर्दंड; नेमका निर्णय काय जाणून घ्या
जुलै 2026 मध्ये केरळच्या पलक्कड या ग्राहक आयोगानेही अशाच एका प्रकरणात रेल्वेला थेट 50 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत. प्रवाशांना त्यांच्या आरक्षित सीटपर्यंत पोहोचता आलेले नव्हते. तांत्रिक कारणाने डबा कमी केला तरी सुद्धा रेल्वेलाच पर्यायी व्यवस्था करावी लागते.
अशा वेळी काय करावे?
प्रवाशांनी सर्वात आधी टीटीईकडे तक्रार करावी. महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांनी तुमचे तिकीट, कोच आणि बर्थ नंबर जवळ ठेवावा. पुरावा म्हणून फोटो किंवा व्हिडिओ काढून घ्या. 139 ही हेल्पलाइन किंवा Railmadad अॅपवर तक्रार नोंदवा. जर चूक रेल्वेची असेल , तर तिकीटाचे पैसे हे परत मिळण्यासोबतच नुकसान भरपाई मिळू शकते.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
विजयादशमीदिनी महत्त्वाच्या घडामोडी | Dussehra Festival News Live
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.