Weather Update: राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याने दिला इशारा; 14 जिल्ह्यांसाठी हायअलर्ट जारी

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली असताना पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याने दिला इशारा; 14 जिल्ह्यांसाठी हायअलर्ट जारी

Weather Update: राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झालेली असताना पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वाऱ्याची दिशा बदलली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही त्याचा परिणाम पाहायला मिळाला. एवढंच नाही तर महाराष्ट्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन सारखी स्थिती पुन्हा एकदा निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ डॉ. सुप्रीत यांनी दिली. महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस 
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 25 ते 30 सप्टेंबर या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस मोठ्या प्रमाणात वाढेल. मागच्या चार दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. हवामानातील बदलांमुळे वाऱ्यांची दिशा बदलली असून, यामुळे मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे.

डॉ. सुप्रीत यांनी दिली महत्त्वाची अपडेट
या आठवड्यात, विशेषतः आठवड्याच्या शेवटी पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुढचे पाच दिवस हवामान कसं राहणार?
25 सप्टेंबर –
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम
ऑरेंज अलर्ट- चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ

हेही वाचा: Maharashtra Rain Update: राज्यात 24 ते 29 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम, 18 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

26 सप्टेंबर- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम
ऑरेंज अलर्ट- कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी

27 सप्टेंबर- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम
ऑरेंज अलर्ट- ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूर

28 सप्टेंबर- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम
ऑरेंज अलर्ट- ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूर,

29 सप्टेंबर- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, ठाणे, मुंबई

30 सप्टेंबर- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, ठाणे, मुंबई

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number