Raj Thackeray: ‘मराठी आता फक्त बोलण्याची भाषा नाही, तर…’; राज ठाकरेंची डोळ्यांत अंजन घालणारी पोस्ट

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता युगात मराठी भाषेसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगत मराठीत डिजिटल कंटेंट आणि डेटा निर्मिती वाढवण्याचे आवाहन केले आहे.

Raj Thackeray: ‘मराठी आता फक्त बोलण्याची भाषा नाही, तर…’; राज ठाकरेंची डोळ्यांत अंजन घालणारी पोस्ट

मुंबई: मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समस्त मराठी बांधवांना आणि मराठी प्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मराठी भाषेचे भविष्य यावर अत्यंत मार्मिक आणि दूरदृष्टी असलेला विचार मांडला आहे.

या संदर्भातील राज ठाकरे यांनी लिहले आहे, “आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे. मध्यंतरी मला काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली दाखवल्या. त्या बघितल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे आता ज्ञान मिळवायला किंवा व्यक्त व्हायला किंवा अर्थार्जन करायला या प्रणालींचा हवा तसा वापर करणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही.”

राज ठाकरे यांनी  मांडलेले महत्त्वाचे मुद्दे:

डेटा हीच नवी शक्ती: 10 हजार वर्षांपूर्वी जमीन आणि औद्योगिक क्रांतीनंतर मशिन्स शक्ती ठरल्या. डिजिटल युगात डेटा शक्तिवान ठरला, परंतु आता AI च्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल, त्या भाषा शक्तिशाली ठरतील.

मराठी कंटेंटची निर्मिती: महाराष्ट्र सैनिक आणि मराठी जणांनी मराठी भाषेतून अतिप्रचंड पण उत्तम दर्जाचा डेटा कसा तयार होईल हे बघितले पाहिजे.

हेही वाचा: Maharashtra Weather Today: फेब्रुवारीनेच काढला घाम! एकीकडे ढगाळ वातावरण तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा, नागरिक त्रस्त

काय करावे? जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीत व्यक्त व्हा. आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञतेनुसार मराठी ब्लॉग्स, पॉडकास्टस आणि कोडिंगपासून ते डिजिटल विश्वकोशापर्यंत सर्वकाही मराठीत उपलब्ध होऊ द्या.

शिक्षणात बदल: शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय आणि ती प्रणाली कशी हाताळायची, हे सर्व मुलांना मराठीतून शिकवले गेले पाहिजे.

संधीचे सोने करा: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या जाण्याची भीती व्यक्त होत असली, तरी हे तंत्रज्ञान आत्मसात केल्यास मराठी माणूस स्वतःचे मोठे साम्राज्य उभे करू शकेल.

राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, आपण मराठीच्या सार्वभौमत्वासाठी नेहमीच आवाज उठवला आहे, पण आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषेतून ‘ज्ञान मिळवण्याबाबतचे सार्वभौमत्व’ मिळवणे शक्य आहे.

शेवटी त्यांनी आवाहन केले की, “समाज माध्यमांवर मराठीत टीका, द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका.” जेणेकरून मराठी भाषा डिजिटल जगातील ज्ञानाची खंबीर वाहक बनेल.

हेही वाचा: Stock Market Today: शेअर बाजार सध्या ‘कन्फ्युज’ अवस्थेत; आज मार्केटची स्थिती ‘एकडे आड तिकडे विहीर’, काय घडतंय नेमकं?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number