Tuesday, November 11, 2025 10:07:46 PM

Raj Thackeray: 'राज्यात 96 लाख खोटे मतदार याद्यांमध्ये भरण्यात आले', राज ठाकरेंचा गंभीर आरोप

मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानात मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.

raj thackeray राज्यात 96 लाख खोटे मतदार याद्यांमध्ये भरण्यात आले राज ठाकरेंचा गंभीर आरोप

मुंबई: मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानात मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. तसेच महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने 96 लाख खोटे मतदार याद्यांमध्ये भरण्यात आले आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी केला. माझ्याकडे याबाबतची खात्रीलायक माहिती असल्याचा दावा राज ठाकरेंकडून करण्यात आला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले ?
मी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. दिवाळीच्या मध्यात आपण हा मेळावा आयोजित केला आहे. यावेळची निवडणूक आपण ठरवू तेव्हा लागेल. मतदार याद्यांचा गोंधळ आत्ताचा नाही. हा गेल्या काही वर्षांचा आहे. 2016-2017 ला मी व्होटिंग मशीन आणि मतदार याद्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. एमआयजी क्लबमध्ये ती पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी अनेकांना मी जे बोललो त्याचं गांभीर्य कळलं नव्हतं. प्रत्येकाच्या दरवाजावर टकटक झाली, तेव्हा कळलं की काय प्रकार चालले आहेत. 

हेही वाचा: Raj Thackeray On EC: 'तुम्ही फक्त महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवा...'; राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला थेट आव्हान

'महाराष्ट्रात 96 लाख खोटे मतदार'
राज ठाकरे म्हणाले, "विधानसभेची निवडणूक झाली, 232 आमदार निवडून आले. एवढं प्रचंड यश मिळूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता. मतदार तर आवाक झालेच होते पण निवडून आलेलेही आवाक झाले होते. कारण त्यांनाही कळलं नाही कसा निवडून आलो. मग सगळ्यांनाच समजलं की निवडणुका कशा प्रकारे चालल्या आहेत. कसे विजय मिळतात, कसं यश मिळतं ते कळलं. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये रुपांतर होत नाहीत असं अनेक जण म्हणतात. असं केलं तर कशी काय मिळेल मतं? मला तर कळालं आहे की आत्ताच्या निवडणुकांसाठी 1 जुलैला निवडणुकांसाठी यादी बंद केली आहे. जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. मुंबईत आठ ते साडेआठ लाख मतदार, ठाण्यात, पुण्यात अशा प्रत्येक ठिकाणी भरले आहेत. अशा निवडणुका होणार आहेत. तर मग प्रचार कशाला करायचा?". तसेच तुम्ही मतं द्या किंवा नका देऊ मॅच फिक्स झाली आहे. अशा प्रकारे निवडणुका होणार का? ही कोणती लोकशाही आहे? असेप्रश्न राज यांनी उपस्थित केले आहेत. 

पुढे बोलताना, शिवाय मला आणखी एक गोष्ट समजत नाही. आम्ही या सगळ्या घोळांबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहोत. असं असताना सत्ताधारी पक्षांना राग का येतो आहे? कारण त्यांना माहित आहे त्यांनी काय केलं आहे असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. हीच माणसं जेव्हा विरोधी पक्षात होती त्यावेळी आत्ता जे मी बोलतो आहे तेच बोलत होते. माझ्याकडे नरेंद्र मोदींचं एक भाषण आहे. त्यात शेवटची दहा सेकंद नीट ऐका. असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींचा व्हिडीओ लावला.

काय आहे नरेंद्र मोदींच्या व्हिडीओत?
आज मी भारतीय निवडणूक आयोगाकडे जाहीरपणे एक गंभीर तक्रार करत आहे. जर निवडणूक आयोगाकडे पंच म्हणून आगामी निवडणुका निष्पक्षपणे पार पाडण्याची हिंमत असेल तर कृपया काळजीपूर्वक ऐका. माझे भाषण निवडणूक आयोगाला पोहोचवावे. जर गुजरातमध्ये निवडणुका शांततेत झाल्या तर निवडणूक आयोगाला श्रेय मिळत नाही. परंतु, जर महाराष्ट्र, बिहार आणि बंगालमध्ये निवडणुका शांततेत झाल्या तर निवडणूक आयोगाला श्रेय मिळते. आमच्या लोकांवर खोटे खटले दाखल केले जात आहेत. तुम्ही तुमची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली पाहिजे. मी काही जागांचा उल्लेख केला आहे; बंगाल, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात हे होणार आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्याची जबाबदारी तुमची नाही का? तुमच्याकडे पंतप्रधानांपेक्षाही जास्त शक्ती आहे. मग तुम्ही कारवाई का करत नाही? जर तुम्हाला माझ्या बोलण्याबद्दल वाईट वाटत असेल तर गुन्हा दाखल करा. पण निष्पक्ष निवडणुका घेणे ही तुमची जबाबदारी आहे. मी खूप गंभीर आरोप करत आहे. लोकशाही अशा प्रकारे चालत नाही. 30 तारखेच्या निवडणुकांमध्ये धांदल झाली असं मोदी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. मी काय वेगळं बोलतो आहे? असं राज ठाकरे म्हणाले. 

 


सम्बन्धित सामग्री