मनसेचं इंजिन सावरण्यासाठी राज ठाकरेंचा डोंबिवली दौरा

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या इंजिनाचे डबे घसरू नयेत यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे डोंबिवलीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पक्षापुढे नवा कार्यक्रम ठेवतात, झाडाझडती घेतात की व्यूहरचना ठरवतात याकडे मनसेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक फुटले. केडीएमसीतील मनसेचे नऊ नगरसेवक शिवसेना किंवा भाजपाच्या गळाला लागू नयेत. […]

मनसेचं इंजिन सावरण्यासाठी राज ठाकरेंचा डोंबिवली दौरा

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या इंजिनाचे डबे घसरू नयेत यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे डोंबिवलीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पक्षापुढे नवा कार्यक्रम ठेवतात, झाडाझडती घेतात की व्यूहरचना ठरवतात याकडे मनसेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक फुटले. केडीएमसीतील मनसेचे नऊ नगरसेवक शिवसेना किंवा भाजपाच्या गळाला लागू नयेत. यासाठी राज ठाकरे यांनी हा दौरा आखल्याची चर्चा सुरु आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number