मुंबई : रिपब्लिन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्याचे सुचित केले आहे. रामदास आठवले यांनी एक्स पोस्ट करत प्रकाश आंबेडकर यांना बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्यांनी आता एकत्र येऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, असे या कवितेतून सुचवले आहे. रामदास आठवले हे सत्तेत असलेल्या एनडीए पक्षातील एक घटक पक्ष असून प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या माध्यमातून स्वतंत्रपणे निवडणुकांमध्ये उतरत आहेत. दरम्यान, रामदास आठवलेंच्या या मैत्रीपूर्ण ट्वीटला प्रकाश आंबेडकर प्रतिसाद देणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा : Hundreds of Activists Join MNS: दहिसरमध्ये शिवसेना-भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश
काय म्हटले आहे कवितेत
एक कदम महाबोधि महाविहार के लिए,
एक कदम आंबेडकरी एकता के लिए,
एक कदम बाबासाहेब के सपने के लिए…...
महाबोधी की मुक्ति की है पुकार,
आंबेडकरी एकता हो अब आधार।
टूटे रिश्तों को जोड़ने चला,
बाबासाहेब का सपना फिर से खिला।