मुंबई: माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे इतक्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत असे खळबळजनक विधान मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. तसेच राणेंनी अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, मर्डरही झाले असे वक्तव्य भरत गोगावले यांनी केले. त्यांच्या वक्तव्याने चर्चांणा उधाण आले आहे.
'राणेंनी अंगावर केसेस घेतल्या'
मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्याबद्दल खळबळ माजवणारी वक्तव्ये केली आहेत. राणेंनी अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, मर्डरही झाले असे गोगवलेंनी म्हटले आहे. गोगावलेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. यावर ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोगावले जे राणेंबद्दल बोलले ते योग्यच असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. तसेच राणेंनी मर्डर, मारामारी करुन पक्ष वाढवला असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा: 5 तारखेआधी हिंदी सक्ती मागे घेतल्यास जल्लोष करू; मनसे नेते यशवंत किल्लेदारांची माहिती
'राणे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत'
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याची बैठक कुडाळ पावशी येथे संपन्न झाली. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं. नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत. अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामारी केल्या, मर्डर सगळं झालं. वेगळं सांगायची आवश्यकता नाही. निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही. सगळं जुळवून चालवायचं आहे अशी वक्तव्ये मंत्री भरत गोगावले यांनी केली आहेत.
'भरत गोगावलेंच्या मनातले ओठावर असते'
"भरत गोगावलेंसोबत मीही काम केलं आहे, जे त्यांच्या मनात असतं ते ओठावर नेहमी असतं. नारायण राणे यांच्याबद्दल बोलले ते योग्य आहे .राणेंनी संघटना अशाच गोष्टीतून वाढवली आहे. ज्या पद्धतीने राणेंनी मर्डर मारामारी करून पक्ष वाढवला. निवडणुकीत पुरतच लाडक्या बहिणींचा प्रेम, जर एखाद्याला केलं तर आपण ते बोलून दाखवत नाही, हे काय तुमच्या खिशातले पैसे दिले नाहीत सरकारच्या वेगवेगळ्या योजना कमी करून हे पैसे दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लाडक्या बहीण योजनाही निवडणुकीसाठी वापर केला आहे सिद्ध झालं" असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.