महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज जालना जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी बदनापूर तालुक्यातील वरुडी येथे सोयाबिन पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यानंतर त्यांनी जालना शहरात येऊन नागरीकांची निवेदने देखील स्वीकारली.
दरम्यान शरद पवार म्हणतील त्या जीआर प्रमाणे काम करू असं आश्वासन यावेळी बावनकुळे यांनी दिलं. विरोधी पक्षांच्या पूर्ण सूचनांचे निराकरण केले जाईल. मात्र शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करून कुणीही शेतकऱ्यांचा फूटबॉल करू नये, असा सल्ला विरोधी पक्षांना बावनकुळे यांनी दिला.
हेही वाचा- ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत…’; आदित्य ठाकरेंची मुख्य निवडणूक आयुक्तांवर थेट टीका
शेतकऱ्यांना दिवाळीच्या आतच प्रत्यक्ष मदत मदत देण्याचा विचार,सर्व निकषांचा विचार करून जास्तीत जास्त मदत करण्याचा सरकारचा विचार असल्याचं बावणकुळे म्हणाले. पुढे ज्ञानेश कुमारांचा राजीनामा बाबत बोलताना मी निवडणूक आयोगाचा वकील नाही, गावात जो माणूस दिसेल त्याचे मतदार यादीत नाव, 12 तारखेपर्यत मुदत आहे.
मतदार यादीतील चुका दुरुस्त करून घ्या तुम्ही ते नाही करणार अशी टीका बावनकुळे यांनी केली. विरोधकांनी दुष्काळात एकत्र यावे आम्ही ऐकायला तयार असल्याचं सांगत ज्ञानेश कुमारांना जेलमध्ये टाका हा उध्दव ठाकरेंचा सहावा अँटम असल्याची टीका बावनकुळे यांनी उध्दव ठाकरेंवर केली.