Tuesday, November 18, 2025 04:15:45 AM

SBI Beed Robbery: धारूरमध्ये SBI बँकेत शेतकऱ्याच्या खिशातून 50 हजार रुपयांची चोरी; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

आरोपीने हुशारीने शेतकऱ्याच्या खिशातून 50 हजार रुपये लुटले. ही घटना बँकेत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात स्पष्टपणे कैद झाली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

sbi beed robbery धारूरमध्ये sbi बँकेत शेतकऱ्याच्या खिशातून 50 हजार रुपयांची चोरी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

SBI Beed Robbery: बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. येथे आरोपीने हुशारीने शेतकऱ्याच्या खिशातून 50 हजार रुपये लुटले. ही घटना बँकेत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात स्पष्टपणे कैद झाली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

शेतकरी पैसे काढण्यासाठी बँकेत आला 

प्राप्त माहितीनुसार, शेतकरी बँकेत पैसे काढण्यासाठी आला होता. पैसे काढल्यानंतर काही क्षणांपर्यंत तो व्यस्त होता. या दरम्यान बँकेत उपस्थित असलेला तरुण त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की आरोपी बराच वेळ संधी शोधत बँकेत फिरत होता. शेतकऱ्याकडून निष्काळजीपणा होताच आरोपीने पटकन 50 हजार रुपये चोरून बँकेतून पळ काढला.

हेही वाचा - Cyber Fraud New Rules: सायबर गुन्हे कमी करण्यासाठी सरकारचे निर्णायक पाऊल, मोबाईल कंपन्यांना नवीन नियम निर्बंधकारक

घटना सीसीटीव्हीत कैद

पैसे हरवल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने ताबडतोब बँक कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. धारूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्ही फुटेज घेतले असून, त्यात आरोपीचे कृत्य स्पष्ट दिसते.

हेही वाचा - Kalachowki Crime : काळाचौकीत रक्तरंजित थरार! रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीवर केले वार

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 

दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला दाखल केला असून फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांना आणि बँकेचे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. स्थानिकांनी बँकेतील सुरक्षा व सीसीटीव्ही देखरेख अधिक मजबूत करण्याची मागणी केली आहे. तथापी, पोलिसांनी आरोपी लवकरच अटक केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. 


सम्बन्धित सामग्री