जळगाव : जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील एका तरुणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोठा राडा झाला. दोन्ही कुटुंबांतील सदस्य पोलीस ठाण्यात आल्यानंतर सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हा वाद हाणामारी आणि दगडफेकीपर्यंत पोहोचला. संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना एक पोलिस कर्मचारी जखमी […]
जळगाव : जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील एका तरुणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोठा राडा झाला. दोन्ही कुटुंबांतील सदस्य पोलीस ठाण्यात आल्यानंतर सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हा वाद हाणामारी आणि दगडफेकीपर्यंत पोहोचला. संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी जलद कृती दलाला पाचारण केले. जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. अखेर मध्यरात्रीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल नव्हता.