Tuesday, November 18, 2025 03:45:51 AM

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरून प्रवास होणार सुलभ; 29 किलोमीटरचा उन्नत मार्ग अन् 6000 कोटी रुपयांचा निधी; जाणून घ्या काय आहे MMRDA चा नवा प्लॅन

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणे आता आणखी सोपा होणार आहे. वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी एमएमआरडीएने आमने ते साकेत दरम्यान, जवळपास 29 किलोमीटरचा उन्नत मार्ग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

samruddhi highway  समृद्धी महामार्गावरून प्रवास होणार सुलभ 29 किलोमीटरचा उन्नत मार्ग अन् 6000 कोटी रुपयांचा निधी जाणून घ्या काय आहे mmrda चा नवा प्लॅन

मुंबई: समृद्धी महामार्गावरून प्रवास करणे आता आणखी सोपा होणार आहे. वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी एमएमआरडीएने आमने ते साकेत दरम्यान, जवळपास 29 किलोमीटरचा उन्नत मार्ग बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी, 6 हजार कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, प्रवाशांची होणारी गैरसोय टाळता येईल, तसेच, प्रवाशांच्या वेळेची बचतही होणार, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना भिवंडी आणि ठाणेला जाणाऱ्या प्रवाशांना आणि ठाण्याहून मुंबईला जाणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, इतकंच नाही, तर आमने ते ठाणे पोहोचण्यासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे, प्रवाशांना विविध प्रकारचा त्रास उद्भवतो. या समस्यांवर उपाय म्हणून एमएमआरडीएने छेडानगर ते आनंदनगर हा रस्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच, आनंदनगर ते साकेत असा उन्नत मार्गही बनवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतल्याचे सांगितले जात आहे. यामुळे, आगामी काळात साकेत ते मुंबईदरम्यान प्रवास करणे आणखी सुलभ होईल आणि भविष्यात वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Ambadas Danve : 'कटप्रमुखां'च्या योजना 'चालू सरकार'नं केल्या बंद; शिंदे-फडणवीसांना अंबादास दानवेंचा टोला

मिळालेल्या माहितीनुसार, आमने ते साकेत हा प्रवास जवळपास 29 किलोमीटरचा आहे. तसेच, साकेत ते आनंदनगर हा प्रवास तब्बल 8.24 किलोमीटरचा आहे. यासह, आनंदनगर ते छेडानगर 12.955 किलोमीटर आणि छेडानगर ते फोर्ट हा प्रवास 18 किलोमीटरचा आहे. असे सांगितले जाते की, छेडानगर ते आनंदनगर हा मार्ग 40 मीटर विस्तृत असून यात सहा लेन असणार. तसेच, छेडानगर ते आनंदनगर या मार्गासाठी जवळपास 2 हजार 683 कोटी रुपयांचा निधी खर्च होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आनंदनगर ते साकेत मार्गासाठी अंदाजे 1 हजार 874 कोटी खर्च होणार असून, या मार्गावर 6 लेन आहे. हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि वेळेची बचत होईल, अशी अपेक्षा आहे.


सम्बन्धित सामग्री