Monday, March 09, 2026 08:49:56 AM

Ambadas Danve : संदिपान भुमरेंचा ड्रायव्हर 1150 कोटींचा मालक?; अंबादास दानवेंनी पुराव्यांसह उघड केला महाघोटाळा

खासदार संदिपान भुमरे यांनी आपल्या ड्रायव्हरचा वापर करून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकल्याचा दावा करत दानवे यांनी पुराव्यांची 'फाईल'च माध्यमांसमोर उघडली.

ambadas danve  संदिपान भुमरेंचा ड्रायव्हर 1150 कोटींचा मालक अंबादास दानवेंनी पुराव्यांसह उघड केला महाघोटाळा

Ambadas Danve on Sandipan Bhumre: समृद्धी महामार्गालगतच्या जमिनीच्या संपादनातून चक्क 1150 कोटी रुपये हडपण्याचा कट रचला गेल्याचा खळबळजनक आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. खासदार संदिपान भुमरे यांनी आपल्या ड्रायव्हरचा वापर करून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकल्याचा दावा करत दानवे यांनी पुराव्यांची 'फाईल'च माध्यमांसमोर उघडली.

जन्माच्या 14 वर्षे आधीच जमिनीचा व्यवहार?
अंबादास दानवे यांनी या प्रकरणातील एक धक्कादायक तांत्रिक चूक उघड केली आहे. जटवाडा येथील 23 एकर जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी 'जावेद रसूल शेख' नावाच्या व्यक्तीने 1971 चा 'हिबानामा' (मुस्लिम पद्धतीचे हस्तांतरण) सादर केला. मात्र, दानवे यांच्या दाव्यानुसार, ज्या जावेद शेखच्या नावावर ही जमीन आहे, त्याचा जन्म 1985 मध्ये झाला आहे. जर व्यक्तीचा जन्मच 1985 चा असेल, तर त्याच्या नावावर 1971 मध्ये (जन्माच्या 14 वर्षे आधी) व्यवहार कसा होऊ शकतो? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

खासदारांच्या चालकाचे 'कनेक्शन'
जावेद रसूल शेख हा दुसरा तिसरा कोणी नसून खासदार संदिपान भुमरे यांचा वैयक्तिक चालक असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. यापूर्वीही याच चालकाच्या नावावर 400 कोटींचे असेच एक संशयास्पद प्रकरण समोर आले होते. खासदारांच्या वरदहस्तानेच हा 1150 कोटींचा महाघोटाळा शिजला असल्याचे दानवे यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - Dry Day 2026 : महाराष्ट्रात होळी, मोहरम आणि गांधी जयंतीला 'ड्राय डे' असणार की नाही? सरकारने संभ्रम दूर करत दिलं स्पष्टीकरण

तपासाची मागणी आणि मुख्यमंत्र्यांना पत्र
या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने अंबादास दानवे यांनी थेट मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना पत्र लिहून CID चौकशीची मागणी केली आहे. "एका चालकाच्या नावावर इतके कोटींचे व्यवहार होणे अशक्य आहे, यामागील खरे सूत्रधार संदिपान भुमरे आहेत," असे दानवे यांनी निक्षून सांगितले. 


सम्बन्धित सामग्री