Renavi Ghat ST Accident : विट्याजवळील रेणावी घाटात दोन एसटी बसेसची भीषण धडक; उपचारादरम्यान साक्षी पवारचा मृत्यू, मृतांची संख्या 3 वर, 9 जण गंभीर

अधिक गंभीर असलेल्या 7 रुग्णांना पुढील तातडीच्या उपचारासाठी सांगली, कऱ्हाड आणि कोल्हापूर येथील विशेष रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Renavi Ghat ST Accident : विट्याजवळील रेणावी घाटात दोन एसटी बसेसची भीषण धडक; उपचारादरम्यान साक्षी पवारचा मृत्यू, मृतांची संख्या 3 वर, 9 जण गंभीर

Renavi Ghat ST Accident : सांगली जिल्ह्यातील विट्याजवळ विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील रेणावी घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेली 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी साक्षी चंद्रकांत पवार (रा. ऐनवाडी, ता. खानापूर) हिचा विट्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात साक्षीच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला होता. यापूर्वी घटनेच्या दिवशी नंदाबाई हरिदास त्रंबके (60, खानापूर) आणि धोंडिराम लक्ष्मण पाटील (78, बांबवडे, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला होता, ज्यामुळे आता या अपघातातील एकूण मृतांची संख्या 3 वर पोहोचली आहे.

38 प्रवासी जखमी; अतिदक्षता विभागात 9 जणांची मृत्यूशी झुंज
रेणावी घाटातील या भीषण अपघातात एकूण 38 प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी 17 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. जखमींमध्ये शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि लहान मुलांचाही समावेश आहे. विट्यातील खासगी रुग्णालयांमध्ये सध्या 15 प्रवाशांवर उपचार सुरू असून, त्यातील 9 जणांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले आहे. अधिक गंभीर असलेल्या 7 रुग्णांना पुढील तातडीच्या उपचारासाठी सांगली, कऱ्हाड आणि कोल्हापूर येथील विशेष रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – Wardha Accident : वर्ध्यात स्वातंत्र्यदिनाच्या आनंदावर विरजण! बाईकवरील ताबा सुटला अन् भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने 3 विद्यार्थिनींना चिरडलं

मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत आणि जखमींचा मोफत उपचार
या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्याचप्रमाणे अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासन आणि एसटी महामंडळ करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्थानिक आमदार सुहास बाबर यांनी घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याची पाहणी केली आणि परिवहन मंत्र्यांशी संपर्क साधून या मदतीचा पाठपुरावा केला.

स्थानिक प्रशासन अन् आमदारांकडून युद्धपातळीवर मदतकार्य
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी पोहोचून बसेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावमोहीम राबवली. आमदार सुहास बाबर यांनी गुरुवारी (13 ऑगस्ट) उशिरा रात्रीपर्यंत ग्रामीण व खासगी रुग्णालयांना भेटी देऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली व वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीच्या उपचारांचे निर्देश दिले. सध्या पोलीस या अपघाताच्या कारणांचा सखोल तपास करत आहेत.

हेही वाचा – Weather Update : श्रावणात वरुणराजाची जोरदार एन्ट्री! 18 जिल्ह्यांना पावसाचा तडाखा, कुठे यलो तर कुठे कोणता अलर्ट?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number