Sunday, November 16, 2025 06:31:16 PM

Ladki Bahin Scheme Fraud: लाडकी बहिण योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; लाभार्थ्यांमध्ये आढळला 12 हजारहून अधिक पुरुषांचा सहभाग

माहिती अधिकार चौकशीत असे दिसून आले की, 12431 पुरुषांनी स्वतःला महिला दाखवून निधी हडपला. तसेच 77980 अपात्र महिलांनाही या योजनेचा लाभ मिळाला.

ladki bahin scheme fraud लाडकी बहिण योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा लाभार्थ्यांमध्ये आढळला 12 हजारहून अधिक पुरुषांचा सहभाग

Ladki Bahin Scheme Fraud: राज्य सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते, मात्र माहिती अधिकार चौकशीत असे दिसून आले की, 12431 पुरुषांनी स्वतःला महिला दाखवून निधी हडपला. तसेच 77980 अपात्र महिलांनाही या योजनेचा लाभ मिळाला. या अनियमिततेमुळे सरकारला एकूण 164.52 कोटींचे नुकसान झाले, ज्यामध्ये पुरुषांना दिलेले 24.24 कोटी आणि अपात्र महिलांना दिलेले 140.28 कोटी रुपयांचा समावेश आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग

तथापी, हा घोटाळा फक्त लाभार्थ्यांपुरता मर्यादित नाही, तर सरकारी कर्मचाऱ्यांनाही यात सामील आढळले आहे. माहिती अधिकार चौकशीत असे समोर आले की सुमारे 2400 कर्मचाऱ्यांनी अनियमित लाभ घेतला, यामध्ये आयुर्वेद संचालनालयातील 817, जिल्हा परिषदेतील 1183, समाज कल्याण विभागातील 219 आणि कृषी विभागातील 128 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा - Ladki Bahin Yojana: भाऊबीजेच्या आधी सरकारची मोठी घोषणा! लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 1500 रुपयांचा हप्ता

सरकारी कारवाई

दरम्यान, तपासानंतर अपात्र पुरुष आणि महिलांना यादीतून वगळण्यात आले आहे. मात्र वसुली किंवा अन्य कारवाई करणयात आलेली नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की, पुढील तपासात आणखी अनियमितता समोर येऊ शकते.

हेही वाचा - Navi Mumbai International Airport Issue: नवी मुंबई विमानतळ; दि. बा. पाटील नावावरून पुन्हा आंदोलनाची चिन्हे

सध्या अंदाजे 2.41 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत, ज्यामुळे दरमहा सरकारवर सुमारे 3700 कोटीचा आर्थिक भार पडतो. अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, तपास जसजसा पुढे जाईल, तसतसे योजनेच्या गैरवापराचे आकडे वाढू शकतात.
 


सम्बन्धित सामग्री