Wednesday, June 25, 2025 01:34:44 AM

Sharad Pawar: 'तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांवर लक्ष केंद्रित केल जाईल‌'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 26 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या वर्धापनदिनानिमित्त शरद पवार गटाकडून पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शरद पवार यांनी मोठी घोषणा केली.

sharad pawar तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांवर लक्ष केंद्रित केल जाईल‌

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 26 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या वर्धापनदिनानिमित्त शरद पवार गटाकडून पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देण्याचे त्यांनी म्हटले. यामुळे महिला सक्षमीकरणाला बळ मिळणार आहे.  

शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, आपण जागृत राहू या,काहीही झालं तरी आत्मविश्वास ढळू देऊ नका. समाजकारण आणि राजकारण करणार आपला पक्ष आहे. आपण हातात हात घालून काम करू. पुढे बोलताना, जयंत पाटील यांनी प्रामाणिक काम केलं, त्यांनी भावना व्यक्त केल्या, तरुणांना संधी द्या असे सांगितले, तुमची तयारी दिसत नाही, आपण सगळे एकत्रित चर्चा घेऊ, प्रत्येक तालुक्यात नवीन चेहऱ्याला संधी देऊ असे सूचक वक्तव्य पवारांनी केले. 

हेही वाचा : नारायण राणे विरुद्ध प्रकाश महाजन वाद शिगेला

दोन तीन महिन्यात निवडणुका येत आहे. या निवडणुका एकट्याने लढवायच्या की काही ना सोबत घेऊन यावर निर्णय घेऊ. पुढचे तीन महिने तुमचे लक्ष स्थानिक स्वराज संस्था निवडणूकांवर ठेवा. 50 टक्के महिलाना संधी देऊ असेही यावेळी त्यांनी म्हटले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाचा विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले. एक काळ असा होता की जवाहरला नेहरु यांचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी ओळखला जायचा. आज आमचे पाकिस्तान, चीन, बांगलादेशसोबत संबंध चांगले नाहीत. बांगलादेशसाठी भारताने त्याग केला. तो बांगलादेश देखील आपल्यासोबत नाही. देशाचं नेतृत्व करणार्रांनी सुंसवादाची परिस्थिती जाणीपुर्वक निर्माण केलेली नाही. त्यांचा परिणाम देश भोगतोय.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि डावे पक्ष असतील किंवा इतर पक्ष एकत्र येऊन दिल्लीत सुसंवाद निर्माण केला पाहिजे. कोणी आले आणि गेले तरी फरक पडत नाही. आपण एकसंघ राहिलो तर सत्ता येते हा अनुभव आहे. जयंत पाटील यांनी आठ, दहा वर्ष अतिशय प्रामाणिकपणे पक्षाच काम केलंय. त्यांनी सांगितलंय की नव्या पिढीला संधी द्या. तुम्ही त्याला विरोध केला. जयंत पाटलांबाबत निर्णय घेताना पक्षातील सर्वांशी बोलून निर्णय घेऊ. राज्यातील तालुक्या तालुक्यात नवे नेतृत्व उभा केलं जाईल असे म्हणत एक प्रकारे त्यांनी नव्या नेतृत्वाची घोषणा केली. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवायच्या की स्वतंत्रपणे लढवायच्या याचा निर्णय जिल्हा नेतृत्व घेईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की नवीन नेतृत्वाचा निर्णय घेतला जाईल. पुढच्या तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांवर लक्ष केंद्रित केल जाईल‌ असे शरद पवार यांनी सांगितले. 


 


सम्बन्धित सामग्री