Wednesday, November 19, 2025 01:58:09 PM

Sarangi Mahajan on Pankaja Munde: 'ती गुंडगिरीकडे वळली आहे...'; सारंगी महाजन यांची पंकजा मुंडे यांच्यावर खोचक टीका

सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे की, गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार म्हणजे बीड जिल्ह्यातील त्यांचे कार्यकर्ते आणि जनतेतील लोक आहेत. पंकजा आणि धनंजय मुंडे हे केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आले आहेत.

sarangi mahajan on pankaja munde ती गुंडगिरीकडे वळली आहे सारंगी महाजन यांची पंकजा मुंडे यांच्यावर खोचक टीका

Sarangi Mahajan on Pankaja Munde: राज्याच्या राजकारणात सध्या दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार कोण? या प्रश्नावर आता प्रविण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे.

सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे की, गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार म्हणजे बीड जिल्ह्यातील त्यांचे कार्यकर्ते आणि जनतेतील लोक आहेत. पंकजा आणि धनंजय मुंडे हे केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आले आहेत. माझी स्वतःची जमीनसुद्धा या दोघांनी बळकावली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी मुलीला घडवलं, पण ती बिघडली. ती आता गुंडगिरीकडे वळली आहे. ती फक्त रिल्स आणि शोबाजीसाठी करते. तसेच धनंजय मुंडे देखील गुंड आहे. तो लोकांकडून खंडणी वसूल करतो, असा खळबळजनक आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. सारंगी महाजन यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा - New Maharashtra BJP Office: अमित शहांकडून मुंबईत महाराष्ट्र भाजप कार्यालयाची पायाभरणी; म्हणाले, 'राज्यात भाजपला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही...'

रक्ताचं नातं मी विसरले नाही - सारंगी महाजन 

दरम्यान, सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे की, 'आज गोपीनाथ मुंडे असते तर बीडमध्ये शांतता असती. त्यांनी या दोघांना कधीच पुढे आणले नसते. या दोघांच्या राजकारणामुळे बीडमधील जनता प्रचंड नाराज आहे. तथापी, त्यांनी पुढे भावनिक प्रतिक्रिया देत म्हटलं, 'रक्ताचं नातं मी विसरले नाही, ते लोक विसरले आहेत. मुंडे घराण्याचं आम्ही काही बिघडवलेलं नाही. पण ते मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी सगळं विसरलं आहे.'

हेही वाचा - Kurla Railway Station Project: कुर्ला उन्नत रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती; 410 मीटर लांबीचा रॅम्प तयार, डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार काम

मुंडे घराण्यातील हा वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याने बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या वारशावरूनच आता सारंगी महाजन यांनी पंकजा आणि धनंजय मुंडे यांना चांगलेचं धारेवर धरले आहे.  
 


सम्बन्धित सामग्री