छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेच्या आमदाराने भाजपा कार्यकर्त्यांना मारल्याचा अजब प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. त्यामुळे महायुतीत हाणामाऱ्या कशामुळे असा उपस्थित झाला आहे.
शिवसेना म्हणजेच शिंदेंचे आमदार रमेश बोरनारे यांनी भाजपाच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची तक्रार वैजापूर पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. कैलास पवार असे तक्रार करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याचे नावे असून रस्त्याच्या कामावरून हा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. पवार यांनी दिलेल्या तक्रारी त्यांच्या राहत्या घरासमोर रस्त्याचे काम सुरू आहे. तेव्हा पवार हे प्लॉटवर गेले असता तेथे रमेश बोरनारे, उप जिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, तालुका प्रमुख राजू साळुंखे व कार्यकर्ते हे अगोदरच उपस्थित होते. यावेळी नगर पालिकेचे इंजिनिअर देखील उपस्थित होते. बोरनारे यांनी प्लॉट नंबर 48 मधून रस्ता करा असे ठेकेदाराला सांगितले. यानंतर पवार यांनी इंजिनिअर जोरे यांना रस्ता करण्याअगोदर एन ए ले आऊट बघून घ्या असे म्हणाले. यावर बोरनारे यांनी शिवीगाळ करून तुझा जुना हिशोब चुकता करायचा आहे. तुला इथे राहू देणार नाही असे म्हणत कार्यकर्त्यांसह मारहाण केली अशी लेखी तक्रार देण्यात आली आहे.
हेही वाचा: क्राईम पेट्रोल पाहून रचला खूनाचा डाव; दोन पुतण्यांनी केला चुलत्याचा घात
बोरनारे यांनी पोलिसांवर दबाव आणून आपला गुन्हा दाखल करून दिला नाही असा आरोपही पवार यांनी केला आहे. या अगोदरही बोरनारे यांच्यावर त्यांच्या भावजयीला मारहाण करण्याचा आरोप आहे. यानंतर आता भाजपा पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपाने बोरनारे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.