Shivneri Fort Stampede : शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाला गालबोट; चेंगराचेंगरीत अनेक शिवभक्त जखमी

जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्साह सुरू असतानाच एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली. गडावर झालेली गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली.

Shivneri Fort Stampede : शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाला गालबोट; चेंगराचेंगरीत अनेक शिवभक्त जखमी

Shivneri Fort Stampede : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा उत्साह सुरू असतानाच एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली. गडावर झालेली गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत महिला आणि लहान मुलांसह डझनभर लोक जखमी झाले आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अरुंद वाटा आणि अपुरा पोलीस बंदोबस्त
राज्यभरातून शिवज्योती घेऊन आलेले तरुण, विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि भाविकांनी आदल्या रात्रीपासूनच गडावर मोठी गर्दी केली होती. मात्र, हाथी दरवाजा परिसर आणि अंबरखान्याखालील गणेश दरवाजा यांसारख्या अरुंद मार्गांवर एकाच वेळी लोकांची ये-जा वाढल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि चेंगराचेंगरी झाली.

जखमींवर उपचार सुरू
या गोंधळात जखमी झालेल्या भाविकांना तातडीने जुन्नर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस प्रशासनाकडून गर्दीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह
दरवर्षी शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गडावर शासकीय सोहळा पार पडतो. यंदाही सकाळी 9 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम नियोजित असतानाच ही घटना घडली. यामुळे प्रशासनाच्या गर्दी व्यवस्थापनावर आणि सुरक्षेच्या तयारीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. भविष्यात अशा मोठ्या उत्सवांमध्ये योग्य प्रवेश व निर्गमन मार्ग आणि पुरेशा पोलीस बलाची नियुक्ती करण्याची मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.

हेही वाचा – Mumbai Metro: ऐन गर्दीच्या वेळी मुंबई मेट्रोला ब्रेक; या मेट्रो मार्गावर तांत्रिक बिघाड, प्रवासी 15 मिनिटं एकाच जागेवर

राज्यभरात शिवजन्मोत्सवाचा उत्साह
दुसरीकडे, संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. नागपूरच्या महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भव्य आरतीने नागपूरमध्ये शिवरायांची पूजा करून मानवंदना देण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number