Hingoli Farmers : "माझी विहीर चोरीला गेली", हिंगोलीतील धक्कादायक प्रकार समोर! तब्बल 80 शेतकऱ्यांच्या विहिरी चोरीला?

हिंगोली जिल्ह्यातील धनगरवाडी येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेतकरी रामचंद्र खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अजब मागणी करत निवेदन दिले आहे.

Hingoli Farmers : &quotमाझी विहीर चोरीला गेली&quot, हिंगोलीतील धक्कादायक प्रकार समोर! तब्बल 80 शेतकऱ्यांच्या विहिरी चोरीला?

हिंगोली जिल्ह्यातील धनगरवाडी येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेतकरी रामचंद्र खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अजब मागणी करत निवेदन दिले आहे. माझी विहीर चोरीला गेली आहे, ती शोधून द्या अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. रोजगार हमी योजना अंतर्गत अहिल्यादेवी होळकर योजनेसाठी शासनाकडून विहीर मंजूर करण्यात येतात, विहिरीसाठी अनुदान दिले जाते. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर नाही, त्यांना खोदकाम व बांधकामासाठी आर्थिक मदत केली जाते. मात्र रामचंद्र खडसे यांच्या शेतात प्रत्यक्षात साधा खड्डाही खोदण्यात आलेला नाही. तरीही कागदोपत्री विहीर पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले आहे. अनुदानाची रक्कम परस्पर लाटण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा- Ahilyanagar Crime News: नोकरीचे आमिष दिले, VCवर कपडे काढायला सांगायचा, तासनतास… NCP नेत्यावर 25 वर्षीय तरुणीचा गंभीर आरोप
खडसे यांच्याकडे सुमारे दोन एकर शेती आहे. त्यांच्या नावावर विहीर मंजूर झाल्याचे दाखवून लाखो रुपयांचे अनुदान काढण्यात आले. हा प्रकार केवळ त्यांच्यापुरता मर्यादित नसल्याचे समोर आले आहे. गावातील इतर अनेक शेतकऱ्यांच्या नावावरही विहिरी मंजूर झाल्याचे दाखवले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम पूर्ण झाल्याचे कागदोपत्री नोंद करण्यात आली. मजुरांची रोजंदारी दाखवून मोठ्या प्रमाणात निधी लाटल्याचा आल्याचा आरोप आहे. या परिसरातल्या 80 च्या जवळ शेतकऱ्यांची विहिरी चोरी गेल्याचा आरोप आज शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे. तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी या बातमीचा आढावा घेत शेतकऱ्यांसोबत चर्चा साधली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number