Solapur News : सोलापुरात गणेश विसर्जनाची लगबग; भक्तांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने घेतला मोठा निर्णय

Solapur Ganesh Visarjan 2026 : बाप्पाच्या निरोपासाठी सोलापूर सज्ज झाले असून गणेश विसर्जन मार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितता राखण्यासाठी महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Solapur News : सोलापुरात गणेश विसर्जनाची लगबग; भक्तांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने घेतला मोठा निर्णय
सोलापूर गणेश विसर्जनासाठी सज्ज

सोलापूर : गणेश विसर्जनासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. गणेशभक्तांना विसर्जनाच्या वेळी कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये, तसेच विसर्जन प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. शहरातील साधारण 45 ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आलेली आहेत.

बाप्पाच्या निरोपाची तयारी पूर्ण
विसर्जन असलेल्या ठिकाणी सुरक्षेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. शहरातील आठ विसर्जन कुंडांवर रेस्क्यू आणि जीव रक्षकांची टीम तैनात करण्यात आली आहे. महापालिकेने 200 हून अधिक जीव रक्षकांची नियुक्ती केली असून विसर्जनाच्या वेळी कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून त्यांच्याकडून सर्व परिसरात लक्ष ठेवले जाणार आहे.

हेही वाचा-Mumbaicha Raja Visarjan 2026: ‘मुंबईचा राजा’चं उद्या विसर्जन नाही? तराफ्यावरून वाद; ऐतिहासिक मिरवणुकीत विघ्न

विसर्जनाच्या ठिकाणी तसेच परिसरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. त्यामुळेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासह सुरक्षेच्या दृष्टीनेही मदत होणार असून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून विसर्जन मार्गाचीही पाहणी करण्यात आली आहे. गणेश विसर्जन मार्गावरील तब्बल दोन हजारांहून अधिकचे खड्डे बुजवण्यात आले आहे तसेच विसर्जन मिरवणुकीला अडथळा ठरणाऱ्या काही झाडांच्या फांद्यांची छाटणी केली आहे. बंद असलेले स्ट्रीट लाईट सुरु करण्याचेही काम संपवण्याक आले. त्यामुळेच रात्रीच्या वेळी विसर्जनासाठी जाणाऱ्या गणेभक्तांना अधिक सुरक्षितता मिळेल.

गणेशभक्तांसाठी महापालिकेच्या सुविधा सज्ज
गणपती घाट परिसरातील गाळ काढून घाटाची स्वच्छता पूर्ण केली आहे. विसर्जन कुंडातील पाणी देखील स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. त्यासह विसर्जन मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी तसेच गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितता राखता यावी,यासाठी महापालिकेकडून नियोजन करण्यात आलेले आहे. दरम्यान,सर्व गणेभक्तांनी महापालिकेने केलेल्या सुविधांचा वापर करावा तसेच गणेशमूर्तींची सुरक्षित तसेच पर्यावरणपूरक पद्दतीनेच विसर्जन करावे, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे महापौर यांनी केलेले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number