सोलापूर : पेन्शनसाठी आईला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलाने आईच्या डोक्यात कुकरने हल्ला केला आहे. सोलापुरात हा प्रकार घडला आहे.
वडिलांच्या निधनानंतर आईला मिळणारी पेन्शन ती मावशी, मामा यांनाच देत होती. या रागातून पोटच्या मुलानेच आईच्या डोक्यात कुकरने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी घरमालकाच्या फिर्यादीवरून मुलाविरूद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेन्शनसाठी स्वत:च्या आईला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न एका मुलाने केला आहे. सोलापुरात घरमालकाच्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
हेही वाचा : Maharashtra Board SSC Result 2025: कोणताही क्लास न लावता दहावीत मिळाले 100 टक्के गुण
सोलापूरात मुलाकडून आईच्या डोक्यात कुकरने हल्ला
वडिलांच्या निधनानंतर आईला मिळणाऱ्या पेन्शनवरुन एका कुटुंबात वाद निर्माण झाला आहे. आई पेन्शन मावशी, मामा यांनाच देत होती. या रागातून पोटच्या मुलानेच आईच्या डोक्यात कुकरने जोरात मारून ठार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात बिल्डिंग मालकाच्या फिर्यादीवरून मुलाविरूद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हर्षल रामकृष्ण चिचणसुरे असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. मुलाला नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवून पुढे त्याला शिक्षण देऊन नोकरीलायक ज्या आईने बनविले, त्याच आईला काही रुपयांसाठी पोटच्या मुलानेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला. संशयित आरोपी हर्षल चिंचणसुरे हा शिक्षण विभागात लिपिक म्हणून कामाला अहे.
9 मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हर्षलने पेन्शनच्या कारणातून आईसोबत भांडण केले. पेन्शनची रक्कम आई नातेवाईकांनाच देत असल्याच्या रागातून त्याने घरातील कुकर आईच्या डोक्यात घातला. त्यात आई जागेवरच बेशुद्ध पडली. त्यानंतर त्याने मित्राला बोलावून घेतले. विजयालक्ष्मी रामकृष्ण चिंचणसुरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी यासंदर्भात रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी नातेवाईक कोणीच नव्हते. पोलिसांनी अधिक तपास केला असता मुलानेच आईला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली. इमारतीचे मालक अमित सुरेश धुपद यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आईवर हल्ला करणाऱ्या हर्षलला अटक केली. आपण आईला सांभाळतो, तरीदेखील ती पेन्शनची रक्कम नातेवाईकांना देत असल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले. हर्षल हा वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर जिल्हा परिषरदेच्या शिक्षण खात्यात लिपिक म्हणून नोकरीला लागला. आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. या संदर्भातील अहवाल पोलिस शिक्षण विभागाला पाठवणार आहेत. सहायक पोलिस निरीक्षक ज्योत्सना भांबिष्टे अधिकचा तपास करत आहेत.