Monday, November 17, 2025 12:58:56 AM

ST Workers Andolan : दिवाळीत बसणार प्रवाशांना फटका! एसटी कर्मचाऱ्यांची बेमुदत आंदोलन करण्याची घोषणा

मागील काही दिवसांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे 13 ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीने बेमुदत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

st workers andolan  दिवाळीत बसणार प्रवाशांना फटका एसटी कर्मचाऱ्यांची बेमुदत आंदोलन करण्याची घोषणा

मुंबई: ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी सेवा विस्खळीत होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे 13 ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीने बेमुदत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहील, असं वक्तव्य महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. 

'या' आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या

2016 पासून एसटी कर्मचाऱ्यांना 1 हजार 100 कोटी रुपयांच्या महागाई वेतनवाढीचा फरक मिळालेला नाही. 

12 हजार 500 रुपये उचल रक्कम देण्यात यावे.

2 हजार 318 कोटी रुपयांच्या वेतनवाढीचा फरकही मिळालेला नाही. 

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून प्रत्येकी 17 हजार रुपये देण्यात यावे.

तसेच, एसटी कर्मचाऱ्यांची एकूण थकबाकी रक्कम 4000 हजार कोटी रुपये देण्यात यावे.

या आंदोलनाबाबत रविवारी मुंबईत महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीमधील सर्व कामगार संघटनांची बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीतील हणमंत ताटे, श्रीरंग बरगे, संदीप शिंदे, हिरेन रेडकर,पांडुरंग वाघमारे, दादाराव डोंगरे, बंडू फड, संतोष गायकवाड, राजेंद्र मोजाड, विनोद गजभिये, अरुण वीरकर, गौतम कांबळे, विश्वनाथ जाधव, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा: Ramdas Athawale : 'टूटे रिश्तों को जोड़ने चला...'; बाबासाहेबांचं नाव पुढे करत प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्यासाठी रामदास आठवलेंनी घातली साद

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, त्यासाठी तात्काळ तोडगा निघणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार आहे. त्यामुळे, या बैठकीत काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री