Wednesday, November 19, 2025 01:59:48 PM

EC On Maharashtra Election 2025 : महापालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर!; 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांसाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

ec on maharashtra election 2025  महापालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांसाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. आज पार पडलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत सविस्तर माहिती दिली. यानुसार नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी 288 निवडणूक निर्णय अधिकारी तसेच 288 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची व्यवस्था करण्यात आल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले. याशिवाय एकूण पोलीस स्टाफ, काऊंटींग स्टाफ 66,775 निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

निवडणूक आयोग सज्ज - 

एकूण पुरूष मतदार - 53,79,931
एकूण महिला मतदार - 53,22,890 
इतर - 775
एकूण मतदार - 1,07,03,576

एकूण मतदान केंद्र - 13,355 

हेही वाचा : EC On Maharashtra Election Date Announcement : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी

निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तसेच 15 नवीन नगरपंचायती आहेत. 288 सदस्य निवडले जाणार आहे.

10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी 21 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

7 नोव्हेंबरला मतदारयाद्या जाहीर होणार आहेत. उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. अर्ज भरताना जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. 10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. अर्ज माघारीसाठी 21 नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे. 


सम्बन्धित सामग्री