मोकाट कुत्र्याचा सात वर्षीय चिमुकल्यावर हल्ला

पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात उद्यानात खेळण्यासाठी आलेल्या 7 वर्षीय मुलावर कुत्र्याने हल्ला केला. या कुत्र्याने त्या चिमुकल्याला पंधरा ते वीस फूट फरफटत नेऊन त्याचा जबडा फाडल्याची हृदयद्रावक घटना घडली.

मोकाट कुत्र्याचा सात वर्षीय चिमुकल्यावर हल्ला

पुणे: पुण्यातील फर्ग्युसन रोड येथील मॉडेल कॉलनी परिसरातील 'चित्तरंजन वाटिका' महापालिकेच्या उद्यानात खेळण्यासाठी आलेल्या 7 वर्षीय मुलावर कुत्र्याने हल्ला केला. या कुत्र्याने त्या चिमुकल्याला पंधरा ते वीस फूट फरफटत नेऊन त्याचा जबडा फाडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मात्र, वेळीच त्याच्या मित्रांनी त्या कुत्र्याला दगडाने मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

नरेंद्र शेरबहादूर बिस्ता (वय: 7) या गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तो मायेने त्या कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवत होता. मात्र, कुत्र्याने त्याचा जबडा फाडला. या घटनेनंतर स्थानिकांनी त्वरित त्या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्या गालावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे.

नेमका हा प्रकार कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन रोड येथील मॉडेल कॉलनी परिसरातील महापालिकेचे 'चित्तरंजन वाटिका' नावाचे उद्यान आहे. या उद्यानात नेहमीप्रमाणे तो आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी आला होता. यादरम्यान, त्या उद्यानात अनेक भटके कुत्रेही होते. नरेंद्रने त्या भटक्या कुत्र्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवला, मात्र क्षणातच कुत्र्याने नरेंद्रला सुमारे 15 ते 20 फूट फरफडत नेऊन त्याचा जबडा फाडला. नरेंद्रच्या मित्राने वेळीच कुत्र्याला दगड मारल्यामुळे नरेंद्रची सुटका झाली.

तात्काळ उपचारासाठी नरेंद्रला ससून रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे त्यावर प्राथमिक उपचारही करण्यात आले. तथापि, नरेंद्रच्या गालाची शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे होते. मुलाच्या आई-वडिलांनी सामाजिक कार्यकर्ते रविद्र साळेगावकर यांच्या माध्यमातून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याशी संपर्क साधला. शिरोळे यांनी दीनानाथ रुग्णालयाचे प्रशासक सचिन व्यवहारे यांच्याशी संपर्क साधून मुलावर उपचार करण्याचे आदेश दिले. धर्मादाय योजनेद्वारे डॉ. कौस्तुभ प्रभुणे यांनी यशस्वीरित्या प्लास्टिक सर्जरी केली.

हेही वाचा: बनावट कागदपत्र बनवून तीन बांगलादेशी जामीन घेऊन पसार

चिमुकल्याच्या उपचारासाठी स्थानिकांची मदत:

उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांनी मुलाच्या उपचारासाठी जवळपास पंचवीस हजार रूपयांची मदत गोळा केली आणि ती चिमुकल्याच्या औषधोपचासाठी देण्यात आली. सुदैवाने या घटनेतून चिमुकला थोडक्यात वाचला आहे. उद्यानात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number