Sudhir Mungantiwar : ‘आता तो विषय…’ सुधीर मुनगंटीवारांचा नाराजीनाट्यावर पडदा! मोठा निर्णय घेणार?

माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, &quotराज्यभर दौऱ्याचा तो विषय आता संपला आहे. मी लवकरच काही प्रमुख नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.&quot

Sudhir Mungantiwar : ‘आता तो विषय…’ सुधीर मुनगंटीवारांचा नाराजीनाट्यावर पडदा! मोठा निर्णय घेणार?

Sudhir Mungantiwar : भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आपल्या नाराजीच्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आता मवाळ झाली असून, पक्षनेतृत्वाशी चर्चा करून हा विषय संपल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची मोठी पिछेहाट झाली होती. जिल्ह्यातील 11 पैकी केवळ 1 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायत भाजपला जिंकता आली. या पराभवाचे खापर मुनगंटीवारांनी पक्षावर फोडले होते, ज्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. “मंत्रीपद आणि सत्ता येते-जाते, पण कार्यकर्ता महत्त्वाचा असतो,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. या सुप्त संघर्षामुळे मुनगंटीवार पक्षावर नाराज असून ते लवकरच मोठा निर्णय घेतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.

राज्यव्यापी दौरा गुंडाळला अन् मवाळ भूमिका घेतली
नाराजी व्यक्त करताना मुनगंटीवारांनी अन्यायाविरुद्ध राज्यभर दौरा करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता त्यांनी हा दौरा गुंडाळला असून आपली भूमिका बदलली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “राज्यभर दौऱ्याचा तो विषय आता संपला आहे. मी लवकरच काही प्रमुख नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.” कोणत्या नेत्यांशी भेट होणार हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी, पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय भाजप नेते त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते.

हेही वाचा – BMC Elections Mahayutiv vs MVA : सेना भाजप एकत्र लढण्याची मानसिकता पण…; शिरसाट नेमकं काय म्हणाले?

दोन्ही ठाकरे बंधूंना शुभेच्छा; मात्र, ‘तो’ काळा दिवस
सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन शिवसेना (उबाठा)-मनसे युती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याविषयी विचारले असता, मुनगंटीवार यांनी परिस्थितीनुसार सर्वजण निर्णय घेत असतात, असे म्हटले. तसेच, ठाकरे बंधूंना शुभेच्छा देत असल्याचेही ते म्हणाले. ‘..मात्र, 24 नोव्हेंबर 2019 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाचा अतिशय काळा दिवस होता, हे त्यांना (शिवसेना) कधीतरी मान्य करावे लागेल,’ असेही ते म्हणाले.

पक्षात ‘ऑल इज वेल’चे संकेत?
सुधीर मुनगंटीवारांनी घेतलेल्या या माघारीमुळे भाजपमधील संभाव्य फूट टळल्याचे दिसत आहे. मंत्रीपद किंवा पद असो वा नसो, पक्षाप्रती असलेली निष्ठा महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. या सर्व घडामोडींनंतर आता भाजपमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी काळात मुनगंटीवार आणि प्रदेश नेतृत्वातील ही चर्चा पक्षाला चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा उभारी देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा – Pune Election 2026 : ठरलं! त्या तारखेला एकत्र येणार दोन्ही राष्ट्रवादी पक्ष, ‘पवार खेळी’ पुण्याचं राजकारण बदलणार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number