Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! पाच लाख उचल वसूल करण्यासाठी ऊसतोड मजुराचं अपहरण; मुकादमासह तिघांवर गुन्हा दाखल

पाच लाख रुपये उचल ऊसतोड मजुराकडून वसूल करण्यासाठी कारखान्याच्या मुकादमाकडून थेट त्या मजुराचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! पाच लाख उचल वसूल करण्यासाठी ऊसतोड मजुराचं अपहरण; मुकादमासह तिघांवर गुन्हा दाखल

विजय चिडे, प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : ऊस तोडीच्या कामासाठी पाच लाख रुपये उचल ऊसतोड मजुराकडून वसूल करण्यासाठी कारखान्याच्या मुकादमाकडून थेट त्या मजुराचे अपहरण करून नेल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे हद्दीत घडली. याप्रकरणी संशयित मुकादमासह त्याच्या अन्य तीन साथीदारांवर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : Nagpur Leopard: नागपुरात दाट वस्तीतील घरात शिरला बिबट्या; छोट्याशा अलोकने सांगितला 'तो' थरारक प्रसंग

सविस्तर घटना अशी आहे की,

पैठण तालुक्यातील तुपेवाडी येथील रणजीत रमेश राठोड याने पाचोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, वडील रमेश गोविंद राठोड (रा. तुपेवाडी, तालुका पैठण) यांनी कारखान्याची ऊसतोडणी करण्यासाठी उचल म्हणून हुसेन हासम शेख (रा. जायकवाडी धरण, बाग पिंपळगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांच्याकडून पाच लाख रुपये होते. ते पैसे हुसेन शेख मागत असल्याने माझे वडील रमेश राठोड यांनी फोनपेमार्फत त्यापैकी 13 नोव्हेंबर रोजी एक लाख रुपये आणि 14 नोव्हेंबर रोजी 50 हजार रुपये हुसेन शेख यांना माझे काका दिगंबर राठोड यांनी ट्रान्सफर केले होते. तर उर्वरित 3 लाख 50 हजार रुपये एक महिन्याने देण्याचे ठरले होते. परंतु रविवार, 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास माझे वडील रमेश राठोड यांना कारखाना मुकादम हुसेन शेख व इतर तीन जणांनी बोलेरो गाडीत टाकून पैठण तालुक्यातील आडूळ येथून अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. या घटनेची माहिती मला माझे काका दिगंबर राठोड यांनी फोनद्वारे दिली.  त्यानंतर आम्ही वडिलांचा आडुळ परिसरात शोध घेतला. मात्र ते कुठेही आढळून आले नाही. तसेच त्यांच्या फोनवर संपर्क साधला असता ते म्हणाले की, मला मुकादम हुसेन शेख व अन्य तीन जण गाडीत घेऊन निघाले आहेत. यावेळी हुसेन शेख याने फोनवर म्हटले की, मी रमेश याला घेऊन जात आहे. मला माझे पैसे आणून द्या आणि याला घेऊन जा. असे सांगिताच तत्काळ पाचोड पोलीस ठाण्यात जाऊन हुसेन शेख व अन्य तीन जणांविरुद्ध बळजबरीने माझे वडील रमेश राठोड यांना उचलून घेऊन गेल्याबाबत रीतसर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number